टी-सीरिज या संगीत कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांची सून आणि भूषण कुमार याची पत्नी दिव्या खोसला कुमार बऱ्याचदा चर्चेचा विषय बनते. ती तिच्या चाहत्यांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती तसेच फॅशन सेन्स आणि स्टाईलिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. दिव्या सोशल नेटवर्किंग साइट इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि सतत तिचे लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागतात.
नुकताच दिव्याने शेअर केलेला फोटोदेखील जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी अतिशय हॉट स्टाईलमध्ये पोझ देताना दिसली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री एका वॉटर जेट स्कीवर उभी राहून पोझ देत आहे. चाहत्यांना दिव्याचा हा अवतार खूप आवडल्याचे दिसून येत आहे.
दिव्याच्या या फोटोवर दिव्याचे चाहते मोठ्या प्रमाणात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कमेंट सेक्शन अभिनेत्रीच्या कौतुकाने भरून गेले आहे. यावर अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल नताशा गॅलकिनाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने कमेंट करत लिहिले की, “वाव, मी खरच प्रेरित झाले आहे.” अवघ्या एका दिवसात या फोटोवर तब्बल २ लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत.
दिव्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती आणि त्यानंतर तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला. पण तिला खरी ओळख फाल्गुनी पाठक यांच्या ‘अय्यो रामा हाथ से ये दिल खो गया’ या व्हिडिओ अल्बममुळे मिळाली.
दिव्याने ‘लव्ह टुडे’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’, ‘बुलबुल’ या चित्रपटात काम केले आहे. शिवाय तिने ‘यारिया’ आणि ‘सनम रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री बऱ्याच अल्बम गाण्यातही दिसली आहे. आगामी काळात ती जॉन अब्राहम अभिनित ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…