जेव्हा करण मेहराने पत्नी निशा रावलला दिली होती जोरदार कानशिलात! व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा

when karan mehra slapped her wife nisha rawal video goes viral on internet


टीव्ही अभिनेता करण मेहरा आणि अभिनेत्री निशा रावल यांच्यातील वाद आता सर्वांसमोर आला आहे. मंगळवारी (१ जून) दोघांचा वाद पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला आणि त्यांच्या नात्यातील तणाव सर्वांसमोर आला. प्रेमापासून सुरू झालेले हे नाते आता घटस्फोटापर्यंत पोहचले आहे. करण मेहरा आणि निशा रावल यांनी जवळपास ६ वर्षांच्या डेटिंगनंतर २०१२ मध्ये लग्न केले होते. दोघांची भेट ‘हंसते-हंसते’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांमधील भांडणानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये करण त्याची पत्नी निशाला चापट मारताना दिसत आहे.

करण मेहरा आणि निशा रावलचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ, जवळपास एक महिन्यापूर्वीचा आहे. खरं तर बर्‍याचदा दोघे एकत्र रील्स बनवायचे. हा एक इंस्टाग्राम रील व्हिडिओ आहे, ज्यामध्ये दोघे ‘राजा हिंदुस्तानी’च्या गाण्यावर रील व्हिडिओ बनवित आहेत. या व्हिडिओत करण निशाला मस्करीमध्ये कानाखाली मारतो.

या जोडप्याबद्दल बोलायचे झाले, तर निशाने करणविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी करणला अटक केली होती. तथापि जामीन मिळाल्यानंतर करणने दावा केला की, निशाने स्वत: ला दुखापत केली आणि आरोप त्याच्यावर लावला. त्याचबरोबर निशाचा आरोप आहे की, करण चंदीगडमध्ये बर्‍याच दिवसांपासून शुटिंग करत आहे आणि तो गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईत राहत नाहीये. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षापासून तो शूटिंगच्या नावाने चंदीगडला एका मुलीला भेटायला जातो, ज्याच्याशी त्याचे अफेअर चालू आहे.

निशाने असा दावा केला आहे की, तिने स्वत: ते प्रेमाचे मेसेज पाहिले आहेत, जे करणने त्या मुलीला पाठवले होते. तथापि, करणने या अफेअरच्या आरोपाला नाकारले आणि असे म्हटले आहे की, निशा केवळ माझ्या इमेजला खराब करण्यासाठी हे सर्व सांगत आहे.

हेही नक्की वाचा-

-‘डान्स दीवाने’च्या सेटवर माधुरीचा ‘कजरा रे’ गाण्यावर भन्नाट डान्स, इतर जजनेही लावले ठुमके

-‘कुठं मेलास, घरी कधी येणार?’ सुगंधा मिश्राने पतीला असा प्रश्न विचारताच, सासूने टाकला तिच्यावर रागाचा कटाक्ष!

-अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा; अपारशक्ती खुरानाने शेअर केली गोड बातमी


Leave A Reply

Your email address will not be published.