Friday, July 5, 2024

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा अभिनयाला राम राम, सांगितलं ‘हे’ मोठं कारण

प्रसिद्ध कलाका, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता म्हणून ओळखला जानारा अभिनेता आमिर खान याने 90 च्या दशकापासून प्रेक्षकांवर राज्य केले आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम करुन प्रेक्षकंच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याने 1973 साली ‘यादो की बारात‘ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा‘ नंतर अभिनेत्याने इंडस्ट्री सोडण्याचा घेतला मोठा निर्णय.

काही महिन्यापूर्वी आभिनेता आमिर खान (Amir Khan) याने पूर्ण 4 वर्षाच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाने इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केला होता. मात्र, त्याचा लाल सिंग चड्ढा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तोंडघषी जोरदार आपटला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यावर अनेक प्रेक्षकांनी बॉयकॉटची मागनी केली आणि या आगीमध्ये लाल सिंग चड्ढा पूर्णपणे करपून निघाला. जेवढा खर्च चित्रपट बनवण्यसाठी केला होता, तेवढा खर्च देखिल काढण्यात या चित्रपटाला अपयश आले.

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रिमेक होता. मात्र, लोकांनी हिंदी रिमेकवर नाराजी व्यक्त केली आणि चित्रपटाला बॉयकॉट करण्यात आले. लाल सिंग चड्ढापेक्षा ‘फॉरेस्ट गंप’ अधिक उत्तम असल्याच्या अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. यानंतर बातम्या समोर आल्या की, आमिर खान हा 2008 साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘चॅम्पिय’ याचे हिंदी रिमेकसाठी हक्क विकत घेतले आहेत.

अभिनेत्यावर पूर्वीच ‘फॉरेस्ट गंपला हिंदी रिमेक बनवून त्याने कलाकृतीचा दर्जाच घालवला आहे’, असा आरोप केला होता. त्यामुळे अभिनेत्याने ‘चॅम्पियन’ चित्रपटाविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो चॅम्पियनमध्ये कलाकार म्हणून काम करणार होता मात्र, त्याने तो निर्णय मागे घेतला आहे. तो चॅम्पिनमध्ये अभिनय न करण्याची निर्णय घेतला आहे. आमिरने दिल्लीमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान चॅम्पियन चित्रपटाविषयी माहिती दिली की, तो या चित्रपटाचे फक्त निर्मिती करणार आहे.

त्याने माहिती देत सांगितले की, “जेव्हा मी एखादी भूमिका करत असोत, तेव्हा मी त्या पात्रामध्ये खोलवर जात असतो, तेव्हा मला माझ्या आयुष्यात दुसरी कोणतीच गोष्टी महत्वाची वाटत नाही. लाल सिंग चड्ढा नंतर मी चॅम्पियनमध्ये काम करणार होतो, पण मला असं वाटत आहे की, मला आता ब्रेक घ्यायला हवा. चित्रपटाची कथा खूप चांगली आहे, याची स्क्रिप्टही उत्तम आहे. पण मला ब्रेक हवाय. मला माझ्या मुलाबाळांसोबत वेळ घालवायला हवा. गेल्या 35 वर्षापसून मी काम करत आहे. त्यामुळे मी माझ्या जवळच्यांपासून लांब झालो आणि हे माझ्यासाठी फार योग्य नाहीये. मला आता माझं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे.”

आमिर पुढे म्हमाला की, “मी चॅम्पियन चित्रपटाची निर्मिती करेल मात्र, अभिनय करणार नाही. मला चित्रपटावर आणि त्याच्या कथाकथनावर पूर्ण विश्वास आहे. मी या चित्रपटाच्या संदर्भात माहिती देईल की, कोणता कालकार या भूमिकेसाठी योग्य राहील. सध्या मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला माझ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे.”

अमिरच्या अशा निर्णयामुळे प्रेक्षक कशाप्रकारे प्रतिक्रिया देतिल हे पाहाणे खूप महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महेश बाबूवर कोसळलंय दु:खाचं डोंगर, आधी भाऊ मग आई आणि आता वडिलांनी सोडली साथ
बिग ब्रेकिंग! अभिनेता महेशबाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर, आधाराचा हात कायमचा हरवला

हे देखील वाचा