दाक्षिणात्या सुपरस्टारर अभिनेता महेश बाबू याने अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले असून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता दक्षिण साऊथ चित्रपटांच्या वादामध्ये अडकला होता. त्यासोबतच त्याच्या आईचे निधन झाले, त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला 2022 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले ठरले नाही. पूर्वी आई सोडून गेली आणि आता वडीलांनी साथ सोडल्यामुळे अभिनेता खूपच दु:खी आहे.
सोमवार (दि. 14, नोव्हेंबर) रोजी बातमी समोर आली की, अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) याचे वडील घट्टामनेनी शिव राम कृष्ण मूर्ति (Ghattamaneni Siva Rama Krishna Murthy) यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवार (दि,15 नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारस बातमी समोर आली की, वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी हैद्रराबादच्या रुग्णालयात शेवचटा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अभिनेता पूर्णपमे तुटला आहे. कृष्णा यांनी तेलुगू इंडस्ट्रीमध्ये एकूण 350 चित्रपटामध्ये काम केले असून त्यांना 2009 साली पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
गेल्या महिन्यापूर्वी म्हणजेच (दि, 28 सप्टेंबर 2022) रोजी महेश बाबू याची आई इंदिरा देवी (Indira Devi) यांचे निधन झाले होते. त्यांनी सकाळी 4 च्या सुमारास हैद्राबादच्या रुग्नालयात अखेरचा श्वास घेतला. त्या अनेक दिवसांपासून आजारपणाशी झूंज देत होत्या आणि शेवटी त्यांचे निधन झाले. आजीच्या निधनावर महेश बाबू याची मुलगी सितारा घट्टामनेनी (Sitara Ghattamaneni) हिचा अश्रू ढाळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) January 9, 2022
याच वर्षी 11 महिन्यापूर्वी म्हणजेच (दि, 8 जानेवरी) रोजी महेश बाबू याचा मोठा भाऊ अभिनेता आणि निर्माता रमेश बाबू (Rameah Babu) याचे 56 व्या वर्षी निधन झाले होते, तेव्हा महेश बाबूला कोरोना झाला होता,त्यामुळे त्याने सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! अभिनेता महेशबाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर, आधाराचा हात कायमचा हरवला
व्हिडिओ: पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर अडकली लाेकांच्या गर्दीत, रागाने झाली लाल