Sunday, June 23, 2024

दीपिकाचा बिकिनीतील लूक पाहून नवराही झाला खल्लास; म्हणाला, ‘हा चांगला इशारा…’

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघे त्याच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे देखील ते दोघे खूप चर्चेत येतात. अशातच त्यांच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. बॉलीवूडमध्ये दीपिका आणि रणवीरने अभिनयाच्या जोरावर खूर मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. दीपिका आणि रणवीर दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

नुकतीच दीपिकाने (Deepika Padukone) एक पोस्ट शेअर केली आहे. या वर रनवीरने भन्नाट कमेंट केली आहे. या पोस्टने चाहत्याचे लक्ष वेधले आहे. जेव्हा रणवीर सिंग एखाद्य काम करतो तेव्हा त्याच्या कामाच कौतुक त्याची बायको दीपिका पदुकोण भरभरून करते. दीपिकाने नवीन काही केले तर त्यावर रणवीर हमखास काहीतरी बोलत असतो.. मग ते फोटो शुट असो किंवा एखाद्या नवीन चित्रपट असो. हे दोघे एकमेकांचे कौतुक करताना दिसतात.

अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या बोल्डनेस मुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने ब्लॅक अँड व्हाइट बिकिनी परिधान केली आहे. पण हा दीपिका पदुकोणचा जुना फोटो आहे. फोटो शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एकेकाळी…पण फार पूर्वी नाही.” दीपिकाच्या या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तर तिचा पती रणवीर सिंगने देखील एक कमेंट केली आहे.

यावेळी कमेंट करताना रणवीर सिंगने लिहिले आहे की, “हा एक चांगला इशारा आहे.” रणवीर सिंग व्यतिरिक्त, बिपाशा बसू, मनीष मल्होत्रा, शिबानी दांडेकर, भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि अनेक चाहत्यांनी दीपिका पदुकोणच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Ranveer Singh commented on Deepika Padukone’s bikini look)

अधिक वाचा- 
दारूच्या व्यसनात बुडालेल्या मीना कुमारी यांचा ‘असा’ झाला मृत्यू, औषधाऐवजी प्यायच्या दारू
‘असं’ काय झालं होतं? ज्यामुळे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना भरसभेत मागावी लागली होती मीना कुमारींची माफी!

हे देखील वाचा