Saturday, June 15, 2024

‘खेलेंगे केबीसी, जानते नहीं एबीसी’ अमिताभ बच्चन यांनी लिहिले रॅप सॉन्ग, केबीसीच्या सेटवर दिसला स्वॅग

मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे संपूर्ण जगच दिवाने आहेत. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रत्येक भूमिकेचे सोने केले. अशीच कोणतीच भूमिका नसेल जी अमिताभ यांनी त्यांच्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये साकारली नसेल. अभिनयाशिवाय, उत्तम सूत्रसंचालक, गायक आदी अनेक भूमिका त्यांनी सक्षमतेने पार पडल्या. आज वयाच्या ७९ वर्षी देखील ते अनेक नवनवीन गोष्टी शिकताना दिसतात. त्यांची या वयातही शिकण्याची तीव्र इच्छा त्यांना इतरांपासून नेहमीच वेगळे करते. सध्या जगात रॅप गाण्यांनी तुफान लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली आहे. बॉलिवूडमध्ये देखील अनेक रॅपर गायक आपल्याला दिसतात. अमिताभ बच्चन यांना देखील रॅप सॉन्गची भुरळ पडली आहे.

अमिताभ बच्चन यांचा नुकताच एक नवा गुण सर्वांसमोर आला आहे. अमिताभ यांनी चक्क एक रॅप सॉन्ग लिहिले आहे. गायक रॅपर बादशाहसोबत एक केबीसीचा भाग शूट केल्यानंतर अमिताभ यांनी एक रॅप सॉन्ग बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की,
“‘कुर्सी पर बैठ कर
चश्मा काला डाल कर
गले में सोना चांदी, फोर्सफुली मार कर
चले हैं रैप करने हाथों को हिला कर
कपड़े देखो रॉन्ग हैं जी
ये गाना फिर भी स्ट्रॉन्ग है जी
बिड़ीबी दा दा, दा दा दा दा दा हर
मिला नहीं कोई वर्ड मैचिंग लगा कर
खेलेंगे केबीसी
जानते नहीं एबीसी
चलो बंद करो ये पोस्ट ताला मार कर’

या रॅपसोबत अमिताभ यांनी त्यांचा अतिशय कुल असा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते केबीसीच्या सेटवर दिसत असून, त्यांनी क्लासी सूट आणि त्यावर एकदम स्टायलिश गॉगल देखील घातला आहे.

बिग बी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर फॅन्ससोबतच कलाकार देखील कमेंट्स करताना दिसत आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदींने लिहिले, “खूपच हार्ड”. एका युझरने लिहिले,”टोनी कक्करपेक्षा खूप चांगले.”, एकाने लिहिले, ” ऑसम सर’, अजून एकाने लिहिले, “असेच राहिले तर, बादशहा आणि हनी सिंगला सुट्टी द्यावी लागेल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा