Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

आपल्या नवीन साथीदाराला त्यांच्या घरी घेऊन जाऊ ईच्छित आहेत ‘बिग बी’, पण…

‘मर्द को कभी दर्द नही होता’ या डायलॉगने अनेक प्रेक्षकांचे मन चोरणारे बॉलिवूडचे अभिनेते आहेत अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन देखील इतर कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचा चाहता वर्ग जास्त असल्याने फोटो व्हायरल व्हायला देखील वेळ लागत नाही. अमिताभ बच्चन यांचे सध्या कोलाज केलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या मांडीवर एका कुत्र्याच्या पिलाला घेऊन त्याचे लाड करताना दिसत आहेत. त्यांना त्यांच्या या गोड मित्राला त्यांच्या घरी घेऊन जायचे आहे पण ते नाही नेऊ शकतं. (Amitabh Bachchan share a photo on social media with his new friend)

अमिताभ बच्चन यांनी पिवळ्या रंगाच्या हुडीमध्ये हे फोटो कोलाज शेअर केले आहे. हे कोलाज शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “सेटवरील माझा नवीन मित्र. कोजी आणि माझ्या हातात कंफर्टेबल, याला घरी घेऊन जायचे होते पण…” बिग बी यांनी लिहिलेल्या या कॅप्शनवर त्यांचे चाहते त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत.

त्यांच्या या पोस्टवर त्यांची मुलगी श्वेता बच्चन हीने लिहिले आहे, “पण???.” तर त्यांची नात नव्या नवेली हीने लिहिले आहे, “तुम्ही त्याला घरी घेऊन जायला पाहिजे होतं.” भूमी पेडणेकरने या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तर एका युजरने लिहिले आहे, “जया मॅडम ओरडतील.”

अमिताभ बच्चन या दिवसांत नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. कोरोनामुळे या चित्रपटाची शूटिंग बंद होती. परंतु आता परिस्थिती ठीक झाल्यामुळे पुन्हा शूटिंग सुरू झाली आहे. या चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदाना देखील असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती

हे देखील वाचा