अभिनेत्री क्रिती सेननसोबत डान्स करताना ‘बिग बीं’ना आठवले कॉलेजचे दिवस; फोटो शेअर करत म्हणाले…

‘महानायक’ अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी नेहमी जोडलेले असतात. ते नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात, जे त्यांच्या चाहत्यांना खूप जास्त आवडतात. अशातच अमिताभ यांनी अभिनेत्री क्रिती सेननसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांना त्यांचे कॉलेजचे दिवस आठवले आहेत. या फोटोमध्ये अमिताभ हे क्रितीसोबत बॉलरूम डांस करताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी क्रितीसोबतचा जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये तिने लाल रंगाचा गाऊन घातला आहे. या गाऊनमध्ये लाल धागे आणि आरसे लावून अनेक ठिकाणी भरतकाम करण्यात आले आहे. तसेच अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’च्या अंदाजात सुटाबूटामध्ये दिसत आहेत. हा फोटो कौन बनेगा करोडपती १३’च्या सेटवरचा आहे. यावरून आता स्पष्ट होत आहे की, यावेळी क्रिती ही शानदार शुक्रवारच्या एपिसोडमध्ये अमिताभ यांची पाहुणी असणार आहे.

हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “लाल ड्रेसमध्ये खूप सुंदर क्रिती सेननसोबत बॉलरूम डान्स! आह… कॉलेज आणि कोलकत्तामध्ये घालवलेल्या दिवसांची आठवण आली.”

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अमिताभ यांनी क्रितीसोबत शेअर केलेला फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोला एका तासाच्या आत ३ लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. केबीसीच्या सेटवर दर शुक्रवारी खास पाहुणे बोलवले जातात. आणि केबीसीमध्ये खेळून मिळालेली रक्कम समाज कल्याणाच्या कामासाठी वापरतात. क्रिती आणि अमिताभ यांचा हा फोटो पाहून चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. आता ते १८ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणाऱ्या या विशेष भागाची वाट पाहत आहेत.

याआधी शानदार शुक्रवारी शोले चित्रपटातील हेमा मालिनी आणि रमेश सिप्पी हे दिग्गज कलाकार आले होते. यावेळी ते त्यांच्या शोले चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ते सेलिब्रेट करण्यासाठी आले होते. केबीसीच्या सेटवर खूप मजा- मस्ती केली होती. त्यांनी शोले शूटिंगच्या दरम्यान घडलेल्या सगळ्या गमती-जमती सांगितल्या होत्या. तसेच त्यांनी त्यांचे जुने दिवस पुन्हा जिवंत केले होते. नंतर केबीसीचा खेळ खेळून मिळालेली रक्कम समाज कल्याणाच्या कामासाठी वापरणार असल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

Latest Post