Thursday, April 25, 2024

‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी गुपचूप लग्न केले आहे. तसेच नंतर सोशल मीडियावर त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यांना त्यांचा हा दिवस काही मोजक्या व्यक्तींसोबतच शेअर करायचा असतो. त्यामुळे ते गुपचूप लग्न करतात. अशातच आता अभिनेता अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी यांनी देखील गुपचूप लग्न केले आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिक आपली गर्लफ्रेंड सुहानी चौधरीसोबत सप्तपदी चालला आहे. अभिषेकने ही माहिती आपल्या चाहत्यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

त्यांचा हा विवाह सोहळ्यात खाजगीरीत्या झाला आहे. १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्ली येथे लग्न केले. त्यांच्या लग्नापूर्वीचे प्री-वेडिंग सोहळ्याला २-३ दिवसांपासून सुरुवात झाली होती. त्यात हळद, मेहंदी यांचा समावेश होता. यादरम्यान अभिषेक मलिकने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिषेक मलिकने ‘छल शाह और मात’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते.

अभिषेकने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मिस्टर अँड मिसेस मलिक.” चाहते या पोस्टवर सतत कमेंट करून अभिषेकचे अभिनंदन करत आहेत. अनेक टीव्ही सेलेब्रिटींनीही अभिषेक आणि सुहानीला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाच्या वेळी अभिषेकने बेज शेरवानीसोबत लाल रंगाचा सेहेरा परिधान केला होता. त्याचवेळी सुहानी चौधरीने बेज आणि पेस्टल रंगाचा जड घागरा घातला होता.

हकले दागिण्यांसोबत न्यूड मेकअप सुहानीने केला होता. त्यासोबतच तिने लाल रंगाचा चुडा देखील घातला होता. अभिषेक आणि सुहानी हे कॅमेरामध्ये बघत पोझ देत होते. अभिषेकने हळदी, मेहंदी आणि संगीताचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिषेक सुहानीला किस करताना देखील दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर अभिषेक मलिक शेवटचा ‘पिंजरा खूबसूरुती का’मध्ये दिसला होता. याशिवाय तो ‘पुनर्विवाह एक नई उमीद’, ‘कहा हम कहा तुम’, ‘कैसे ये यारियां’मध्येही दिसला होता.

तसेच अभिषेकने दिव्यांका त्रिपाठीसोबत रोहन श्रीवास्तवची भूमिका साकारली होती. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेपासून अभिषेकने घराघरात पोहोचला. या मालिकेत करण पटेलही मुख्य भूमिकेत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

हे देखील वाचा