Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

लेकाच्या चित्रपटाचे प्रमोशन केल्याने अमिताभ बच्चन झाले ट्रोल, मात्र टीकाकारांनाही दिले त्यांनी चोख प्रत्युत्तर

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांच्यासारखी लोकप्रियता, प्रसिद्धी आणि यश खूप कमी कलाकारांच्या नशिबी येते. आपल्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने त्यांनी हिंदी चित्रपट जगतात यशाचे शिखर गाठले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांचा हा अभिनयाचा वारसा अभिषेक बच्चनला (Abhishek Bachchan) चालवता आला नाही. त्यामुळे अनेकदा अभिषेक बच्चनवर टिका केली जाते. अलिकडेच अमिताभ बच्चन यांना अभिषेक बच्चनच्या ‘दसवी’ चित्रपटाचे प्रमोशन केल्यामुळे ट्रोल केले गेले होते. ज्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही आपल्या खास शैलीत या टीकाकाऱ्यांना उत्तरे दिली आहेत. 

अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या ‘दसवी’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. तुषार जलोटा दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत अरुण कुश्वश आणि शिवम रॉय प्रभाकर हे नवे कलाकार काम करणार आहेत. सध्या अभिषेक बच्चन या चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यस्त आहे. यावेळी अमिताभ बच्चनही त्याच्या या चित्रपटाचे कौतुक करताना दिसले होते. ज्यामुळे त्यांंना नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले होते. आता अमिताभ बच्चन यांनीही आपल्या खास शैलीत सडेतोड उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या चित्रपटाचे कौतुक करताना “मोठ्या मोठ्या शहरात आपला मोठा मोठा फोटो लागतो- गंगाराम चौधरी, माझा मुलगा असल्याने उत्तराधिकारी होणार नाहीस, जो माझा उत्तराधिकारी असेल तोच माझा मुलगा असेल- हरिवंशराय बच्चन” असा कॅप्शन दिला होता. त्यांच्या या पोस्टमुळेच त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती.

आता अमितभ बच्चन यांनी आणखी एक पोस्ट करत त्यांना चोख उत्तर दिले आहे. या पोस्टमध्ये अमिताभ बच्चन “यांनी हो मी करतो, प्रचार, प्रसार मंगलाचार तुम्ही काय करणार आहात?” असे म्हणत थेट टीकाकाऱ्यांना उत्तर दिले आहे. त्यांच्या या पोस्टवर तुम्हाला कोणी काय करणार, अशा भन्नाट प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा