मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध कवियत्री, लेखिका आणि ३५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी लिहिणाऱ्या प्रसिद्ध, दिग्गज गीतकार माया गोविंद यांचे आज गुरुवार (७ एप्रिल) रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी माया यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून माया गोविंद यांची तब्येत अजिबात चांगली नव्हती. ब्रेनमध्ये झालेल्या ब्लड क्लॉटिंगमुळे त्यांना जानेवारी महिन्यात हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधीर झाल्यानंतर त्यांना घरी देखील सोडले गेले. माया गोविंद यांच्यावर पुढील उपचार घरीच होत होते.
माया गोविंद यांचा मुलगा असलेल्या अजय गोविंदने काही दिवसांपूर्वी एका मोठ्या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, त्यांची आई माया गोविंद यांची तब्येत ठीक नसून त्यांना फुप्फुसांना इन्फेक्शन आणि ब्रेनमध्ये क्लॉटिंग झाले आहे. माया गोविंद यांना मुंबईमधील जुहू परिसरातील निधी रुग्णालयात ठेवण्यात आले होते, मात्र त्यांच्या उपचारामध्ये होणार हलगर्जीपणा पाहून त्यांना घरी हलवले गेले आणि घरीच उपचार सुरु झाले. मागच्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.
तत्पूर्वी माया गोविंद या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांनी ८० च्या दशकात अनेक टीव्ही मालिकांसाठी आणि चित्रपटांसाठी आणि म्युझिक अल्बम्ससाठी ३५० पेक्षा अधिक गाणी लिहिली. त्यांना त्यांच्या या अतुलनीय कामासाठी अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. माया गोविंद यांचा जन्म १९४० साली लखनऊमध्ये झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात गीतकार म्हणूनच केली. सौतेला’, ‘रजिया सुल्तान’, ‘बाल ब्रह्मचारी’, ‘आर या पार’, ‘गर्व’, अक्षय कुमारचा ‘मैं खिलाड़ी अनाड़ी’, अमिताभ बच्चन यांचा ‘लाल बादशाह’, ‘याराना’ आदी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक सुपरहिट गाणी लिहिली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- Jackie Chan Birthday: जॅकी चॅनचे बॉलिवूडशी खास नाते, ‘या’ चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांसोबत केले आहे काम
- मैत्रिणीसाठी गाणे गाताना अचानक रडू लागली आम्रपाली दुबे, जाणून घ्या नक्की काय आहे कारण
- जितेंद्र यांना पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते फक्त ‘इतके’ रुपये; तर ६ महिने मिळाला नव्हता पगार