Friday, May 24, 2024

बच्चन कुटुंबातील ‘या’ जिवलग सदस्याच्या मृत्युनंतर हळहळले बिग बी, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘ऊंचाई’ याने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये बिग बिवर दु:खाचं संकट कोसळलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रेक्षकासोबत आपली भावना व्यक्त केली आहे.

अभिनेता अभिनताभ बच्चन (Amitabh Bacchan) सध्या आपल्या ‘ऊंचाई’ (Unchai) चित्रपटामुळे खूपच चर्चेत आले आहेत. त्याच्या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता खूपच आनंदी होते मात्र, त्यांच्या घरातील खूप जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. एकीकडे आनंदाचा क्षण साजरी होत असून दुसरीकडे दु:खद घटना घडल्यामुळे अभिनेता खूपच दु:खी झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या घरातील एका सदस्याच्याे निधन झाले आहे. त्यांच्या घरातील सगळ्यात लाडक्या पाळीव कुत्र्याचे निधन झाल्यामुळे अभिनेत्यानी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कुत्र्याच्या निधनावर भावूक होऊन अमिताभ यांनी आपली भावना व्यक्त करत कुत्र्याचा फोटो शेअर केला असून त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की,”आमचा एक गोड छोटा मित्र.. हे येतात मोठे होतात आणि एक दिवस आपल्याला सोडून जातात.” अशी पोस्ट शेअक करत बिग बी हळहळले आहेत.

आमिताभ यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजन त्यांच्या दु:खामध्ये सामिला झाले आहे, तर काहींनी पाळीव प्राण्याविषयी आपली भावना व्यक्त केली आहे. प्राण्यांना पाळल्यानंतर ते आपल्या घरातील सदस्यापेक्षा कमी नसतात. माणसापेक्षा जास्त काही व्यक्ती पाळीव प्राण्यांना जिव लावत आसतात. त्याचप्रमाने अभिनेत्याने देखिल आपल्या कुत्र्याविषयी प्रेम व्यक्त केले आहे. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये देखिल लिहिले आहे की, “आमच्या या छोट्याशा मित्राच्या कायमचं निघून गेल्यामुळे आम्हाला खूप दु:ख झालं आहे. जेव्हा तो आमच्या जवळ असायचा तेव्हा खूप चैतन्य असायचं.”असं ते म्हणाले.

यापूर्वी बिग बी यांच्या घरी 2013 साली ‘शानौक’ या कुत्र्याचा मृत्यु झाला होता. अमिताभ यांना पाळीव प्राण्याविषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे बिग बी आपल्या कुत्र्याच्या मृत्युनंतर खूपच दु:खी झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुनील शेट्टी स्टारर ‘फाइल नंबर 323’ वादाच्या घेऱ्यात, मेहुल चोकसीने अनुराग कश्यपला पाठवले नोटीस
सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाला मौनीचा हॉटनेस, तुम्हीही पाहा

हे देखील वाचा