Wednesday, May 22, 2024

सुनील शेट्टी स्टारर ‘फाइल नंबर 323’ वादाच्या घेऱ्यात, मेहुल चोकसीने अनुराग कश्यपला पाठवले नोटीस

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याने 90 च्या दशकापासून इंडस्ट्रीमध्ये अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या तो चित्रपटापेक्षा जास्त आपल्या उद्योगधंद्यामुळे ओळखला जोतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सुनील मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपट ‘फाइल नंबर 323’ आगामी योणारा चित्रपट असून वादाच्या घेऱ्यात अडकला आहे.

प्रसिद्ध अभनितेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्टारर ‘फाइल नंबर 323’ हा आगामी येणारा चित्रपट भारतातली घपला करुन भारतातील पैस लुटून विदेशात पळून जाणाऱ्या गुन्हेगारांवर अवलंबून आहे. यामध्ये नीरव मोदी (Nirav Modi) आणि विजय माल्या (Vijay Malya) सारख्या गुन्हेगारांचे नाव सामिला आहे त्यामुळे चित्रपट वादाच्या घेऱ्यात अडकला आहे. मेहुल चोकसी ( Mehul Chokasi) याने चित्रपटाबद्दल तक्रार दाखल केली आहे. यानंतर चित्रपट निर्माता यांनी देखिल कायद्यानुसारच उत्तर देण्याचे ठरवले आहे.

चित्रपट ‘फाइल नंबर 323’ मुळे प्रेक्षकांवर चुकीचा प्रभाव पडण्याचा आरोप करत मेहुल चोकसी याने चित्रपटचे दिग्दर्शक कार्तिक के (Kartik. K) आणि कलोल दास (Kalol Das) आणि पार्थ रावल ( Parth Raval) यांच्यावर ताक्रार दाखल करुन नोटीस पाठवले आहे. मात्र, चित्रपट निर्मात्याच्या मते, ‘हा चित्रपट कोणाचाही बायोपीक नाही. नोटीसमध्ये लिहिले आहे की, ‘फाइल नंबर 323′ या चित्रपटाच्या निर्मात्याने लगेच या चित्रपटाची शुटींग थाबवावी. नोटिस मिळाल्यानंतर 72 घंट्याच्या आतमध्ये चित्रपटाबद्दल सगळेच काम थांबवावे त्याशिवाय चित्रपट निर्मात्याला पब्लीकली माफी मागण्याचाही आदेश दिला आहे.’ मात्र, याबद्दल कालोल दास आणि पार्थ रावल यांच्या मते, ‘चित्रपटामध्ये मेहुल चोकसी यंच्याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही, आणि त्यांचा आरोपही चुकीचा आहे.’

चित्रपट निर्मात्याने सांगितले की, “चित्रपट घटनावर आधारित असून पूर्णपणे रिसर्च करुनच बनवला आहे. यामध्ये कोणाच्याही व्यक्तीमत्तवाला ठेस लागेल असे काहीच केलं नाही. यामध्ये ज्या लोकांनी गरिब भारतीय जनतेचा पैसा लुटून भारत सोडला असून विदेशात लपले आहेत ते देखिल आम्हाला नोटिस पाठवत आहेत. चित्रपट निर्मात्याच्या मते ते लवकरच याचे उत्तर देतील.”

अशाप्रकारच्या कारणामुळे ‘फाइल नंबर 323’ अभिनेता सुनील शेट्टी याचा चित्रपट ट्रेकवर अडकला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळाला मौनीचा हॉटनेस, तुम्हीही पाहा
अर्रर्र! शिव ठाकरे एवढा ट्रोल का होतोय? वीणा जगतापसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल

हे देखील वाचा