Thursday, June 13, 2024

मैत्री असावी तर अशी! अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांच्या मैत्रीचा ‘हा’ किस्सा तुम्हाला करेल भावुक

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अनेक खलनायकाच्या आणि नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत मात्र तरीही त्यांची लोकप्रियता आणि प्रसिद्धी काही कमी झाली नाही. या प्रसिद्ध कलाकारांमध्ये अमजद खान यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अमजद खान आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री खूप घट्ट होती. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. त्यांचा असाच एक किस्सा गाजला होता, जेव्हा अमजद खान यांचा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन  देवासारखे धावून आले होते. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.

 

अमजद खान (Amjad Khan)  हे हिंदी चित्रपट जगतातील एक आघाडीचे अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने त्यांनी अनेक वर्ष चित्रपट क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्यांची शोले चित्रपटातील गब्बरची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेने अमजद खान यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आपल्या अभिनयाइतकेच अमजद खान आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या मैत्रीचीही त्याकाळात चांगलीच चर्चा होती. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. मात्र त्यांची मैत्री किती खास होती याचा एक प्रसंग अमजद खान यांच्या पत्नी शैला यांनी सांगितला होता.

हा सगळा प्रकार ‘द ग्रेट गँबलर’ या चित्रपटादरम्यान घडला होता. जेव्हा अमजद खान यांचा गोव्याजवळील सावंतवाडी गावामध्ये अपघात झाला होता. या अपघातात अमजद खान यांच्या पत्नी शैला सहा महिन्याच्या गर्भवती होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या जखमा झाल्या होत्या. या अपघातात अमजद खान यांचे हाड मोडले होते. त्यांच्या छातीत स्टेअरिंग व्हिल घुसल्याने त्यांच्या फुप्फुसांना जबर मार लागला होता. त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. या अपघातानंतर सगळ्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र त्यांच्यावरील होणाऱ्या पुढील उपचारांच्या कागदपत्रांवर सही करायला कोणीही तयार नव्हते त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपल्या या खास मित्राच्या अडचणीत मदत करत या कागद पत्रावर सह्या केल्या होत्या. हा किस्सा सांगताना शैला खान यांनी दोघांच्या मैत्रीचे कौतुक केले होते.

अधिक वाचा-
दीपिकाचा बर्थडे : लग्नासाठी धर्म बदलल्याने कायम चर्चेत राहिलेली अभिनेत्री, बघा तिचे मुस्लीम नाव
‘तुझी चड्डी नाही उतरवली, तर आदित्य नाव नाही सांगणार’, वादाशी घट्ट नातं असणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक

हे देखील वाचा