अमृता फडणवीसांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, बोल आहेत, ‘मन ही मन तुझे चाहा…’


मागील काही दिवसांपासून एका गाण्याने आख्ख्या देशाला वेड लावले आहे. ते गाणे आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेत गायले गेले आहे. या गाण्याची क्रेझ सामान्य व्यक्ती तर सोडाच, कलाकारांपासून ते मोठमोठ्या राजकारण्यांच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये वाढत चालली आहे. यामध्ये आता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. अमृता या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. कधी त्या महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेमुळे, तर कधी आपल्या सुमधूर आवाजातील गाण्यांमुळे माध्यमांचे लक्ष वेधत असतात. अशातच त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

अमृता फडणवीसांनी गुरुवारी (१८ नोव्हेंबर) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक घोषणा केली होती. मात्र, त्यांनी यामध्ये काहीही स्पष्ट केले नव्हते. त्यांनी ट्वीट करत लिहिले होते की, “आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम…. मी पुन्हा येत आहे !!!”

मात्र, आता त्यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) ट्वीट करत आपल्या गाण्याची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “सध्याच्या तापलेल्या राजकीय घडामोडींमध्ये, या कूल गाण्याचा आनंद लूटा.” अमृता फडणवीस यांनी ‘मनिके मागे हिते’वर आधारित गाणे म्हटले आहे. या गाण्याचे सुरुवातीचे बोल ‘मन ही मन तुझे चाहा…’ असे आहेत.

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १७ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५०० पेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अमृता फडणवीसांबाबत बोलायचं झालं, तर त्याही एक गायिका आहेत. आतापर्यंत त्यांची अनेक गाणी चाहत्यांच्या भेटीला आली आहेत. त्यांनी दिवाळीत भाऊबीजच्या निमित्ताने एक गाणे प्रदर्शित केले होते. त्या गाण्याचे नाव ‘तिला जगू द्या’ असे होते. या गाण्याला १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले होते. विशेष म्हणजे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृतांच्या एका गाण्याचा अल्बमही प्रदर्शित झाला आहे.

अमृता यांनी आतापर्यंत गायलेल्या गाण्यांमध्ये ‘ये नयन डरे डरे’, ‘तेरी बन जाऊंगी (अकाऊस्टिक)’, ‘मुंबई रिव्हर अँथेम’, ‘मोरया रे’, ‘कुणी म्हणाले’, ‘ओम जय लक्ष्मी माता’ यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू मला परवानगी दिली म्हणून…’, सुंदर कॅप्शनसह स्मिता तांबेने केला तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर

-तुटले महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे हृदय! ‘महाराष्ट्राची क्रश’ ऋता दुर्गुळे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

-अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’


Latest Post

error: Content is protected !!