कलाकार त्यांच्या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात राहो न राहो, त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे नक्कीच राहतात. कलाकार आणि त्यांचे अफेयर तर प्रेक्षकांच्या आवडीचा विषय आहे. कलाकार देखील त्यांच्या अफेयर्समुळे सर्वात जास्त चर्चेत असतात. याला कोणतीच अभिनेत्री आणि अभिनेता अपवाद नाही. कलाकारांनी कितीजरी काही लपवायचे म्हटले तरी, मीडियाला प्रत्येक गोष्टीची कुणकुण लागतेच. मग ते अफेयर असो किंवा ब्रेकअप पण मीडियामध्ये येणाऱ्या सर्वच बातम्या नेहमी खऱ्या असतात असे नाही. कधीकधी मीडियाचा अंदाज देखील चुकतो. मात्र ही शक्यता खूपच कमी असते. सध्या मीडियामध्ये एका अभिनेत्रींच्या ब्रेकअपच्या चर्चा खूपच रंगताना दिसत आहे. ही अभिनेत्री आहे एमी जॅक्सन.
‘सिंग इज ब्लिंग’ फेम एमी जॅक्सन सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सध्या एमीचे ब्रेकअप झाल्याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगात आहे. याला कारणही तसेच आहे. एमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे आणि तिचा होणारा नवरा जॉर्ज पानायिटूचे सर्व फोटो डिलीट केले आहे. एमीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे आणि जॉर्जचे अनेक रोमॅंटिक फोटो होते, मात्र तिने ते काढून टाकले आहे. हे फोटो काढल्यामुळे आता अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. एमी आणि जॉर्ज २०१५ पासून रिलेशनशिपमध्ये आहे. २०१९ मध्ये जॉर्जने एमीला जांबियामध्ये लग्नाची मागणी घातली. २०१९ वर्षातच जॉर्ज आणि एमीने साखरपुडा केला. साखरपुड्याच्या तीन महिन्यांनी एमीने ती प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही महिन्यांनी एमीने मुलाला जन्म दिला. त्यांनी त्याचे नाव एंड्रियास ठेवले आहे. (amy jackson ends relationship with fiance george panayiotou?)
मूळची ब्रिटिश असणाऱ्या एमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अभिनयात पदार्पण केले. एमीने तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आदी भाषांमध्ये बरेच सिनेमे केले. एमीने रजनीकांत, अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. एमीने अनेक सिनेमे केले, मात्र तिला अपेक्षित यश काही मिळाले नाही. एमी सर्वात जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच गाजली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’
-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….