जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी


सिनेसृष्टीत ज्यांनी स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर यशाचे सर्वोच्च शिखर गाठले असे महानायक अमिताभ बच्चन, त्यांच्या एका किसिंग सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. बिग बी यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःला झोकून देत त्यांच्या भूमिका, पात्रं जनसामन्यात लोकप्रिय केल्या आहेत. भारतात हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच काही मंडळी असतील, ज्यांना अमिताभ बच्चन हे नाव माहीत नसेल. लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठताना त्या व्यक्तीवर जबाबदारीचे ओझेही वाढत असते. अशातच अमिताभ यांनी दिलेल्या एका किसिंग सीनमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती, ही घटना आहे २००७ मधील अमिताभ बच्चन यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटाची.

ललिता उपन्यास यांनी हॉलिवूड चित्रपट ‘अमेरिकन ब्युटी’ या चित्रपटाने प्रेरित होऊन, ‘निशब्द’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. ‘निशब्द’ या चित्रपटात अमिताभ हे मुख्य नायकाच्या भूमिकेत होते, तर अभिनेत्रीच्या मुख्य पात्रात असणाऱ्या जिया खान हिचा हा पहिला वहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी अनेक इंटिमेट सीन दिले होते.

चित्रपटाच्या कथेत अमिताभ एक विवाहित गृहस्थ दाखवले आहेत. अमिताभ हे त्यांच्या मुलीसोबत शिकत असलेल्या तिच्या मैत्रिणीकडे आकर्षित होतात असं दाखवलं आहे. जिया खान ही त्यांच्या मुलीची मैत्रीण असते. अशामध्ये कथेनुसार, चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जिया खानमध्ये अनेक रोमॅंटिक सीन दाखवले गेले होते. इतकेच नव्हे, तर यात दोघांचा लिपलॉक सीन देखील होता. हा चित्रपटाचा सर्वात हॉट सीन बनला होता, ज्याची त्यावेळी खूप चर्चा रंगली होती. (when amitabh bachchan gave bold scene with jiah khan)

अमिताभ यांचा १९ वर्षीय जिया सोबतचा किसिंग सीन प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. त्यामुळेच की काय ‘निशब्द’ चित्रपट सिनेमागृहात तोंडावर पडला असं म्हणावं लागेल. या चित्रपटाचं चित्रीकरण अवघ्या २० दिवसात पार पडलं होतं. चित्रपटाच्या अपयशामुळे राम गोपाल वर्मा यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘निशब्द’ आणि ‘आग’ सारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांना घेऊन खूप मोठी चूक केल्याचं ते म्हणाले होते. या सगळ्या प्रसंगानंतर आणि कटू अनुभवानंतर अमिताभ बच्चन यांनी अशा चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरण: राजची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी; वकिलांनी जामिनासाठी केला अर्ज

-प्रिया बापट- उमेश कामत यांची जोडी पुन्हा करणार धमाल; ‘आणि काय हवं ३’ लवकरच रसिकांच्या भेटीला

-‘काल मित्राचा कॉल आला, स्ट्रेसमधे होता…’, त्रासात असलेल्या मित्राला संतोष जुवेकरचा बहूमोल सल्ला


Leave A Reply

Your email address will not be published.