‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’


बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने त्याच्या चित्रपटसृष्टीतील ३० वर्षाच्या करीअरमध्ये अनेक भूमिका निभावल्या आहेत. त्याच्या या भूमिकांनी त्याच्या चाहत्यांना खुश करण्यात देखील तो यशस्वी झाला आहे. सिल्व्हर स्क्रीननंतर आता त्याच्या या अभिनयाची जादू ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यासाठी तो तयार आहे. अजय देवगण हा त्याची क्राईम ड्रामा वेबसीरिज ‘रूद्र‌ : द एज ऑफ डार्कनेस’ मधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. या वेबसीरिजच्या टायटलवरून हे समजते की, अजय यावेळी ब्लॅक अँड व्हाइट नाही, तर एक वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. 

अशातच अजय देवगण ‘रूद्र’ सीरिजबाबत बोलला आहे. त्याने डिझ्नी प्लस हॉटस्टारद्वारे आयोजित एका वर्चुअल प्रेस कॉनफरन्समध्ये सांगितले की, “रूद्र एक खूप छान लिहिलेला आणि वास्तववादी शो आहे. हे खरतर माझ्यासाठी देखील काम करत आहे. कारण हे एक ग्रे कॅरेक्टर आहे. एवढे वाद चाललेले असतात, तरी कोणालाच एका चांगल्या व्यक्तीला पाहायचं नसतं.”

त्याच्या आगामी वेब सीरिजबाबत त्याने सांगितले की, “रूद्रला एका ब्रिटीश शोमधून घेतले गेले आहे. त्यामुळे याचा मूळ भाग तोच ठेवला आहे. हेच कारण आहे की, या प्रोजेक्टकडे मी जास्त आकर्षित झालो आहे. मी स्क्रिप्ट येण्याआधीच मूळ शो पाहिला होता. याचे स्केल आणि डिझाईन अगदी तसेच आहे, जसे असायला पाहिजे होते. कोणतीच जबरदस्ती नव्हती. त्यामुळे नाही म्हणायला काहीच कारण नव्हते.” (Ajay Devgan on OTT debut with rudra web series)

पुढे तो म्हणतो की, “आज ओटीटीच्या माध्यमातून जे मनोरंजन दिले जात आहे. ज्याची क्वालिटी उल्लेखनीय आहे आणि चित्रपट निर्मात्यांनी अनेक प्रयोग करण्याचे दरवाजे खुले केले आहेत. ‘रूद्र : द एज ऑफ डार्कनेस’ हे माझ्यासाठी केलेले मोठे काम आहे. एका अभिनेता म्हणून मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी वेगवेगळ्या भुमिका निभावल्या आहेत.”

त्याची ही वेब सीरिज आणि त्याची एक वेगळी भूमिका बघण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरण: राजची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी; वकिलांनी जामिनासाठी केला अर्ज

-प्रिया बापट- उमेश कामत यांची जोडी पुन्हा करणार धमाल; ‘आणि काय हवं ३’ लवकरच रसिकांच्या भेटीला

-‘काल मित्राचा कॉल आला, स्ट्रेसमधे होता…’, त्रासात असलेल्या मित्राला संतोष जुवेकरचा बहूमोल सल्ला


Leave A Reply

Your email address will not be published.