जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


तुम्हाला बॉलिवुडमधील सर्वात उच्चभ्रु घराणे कदाचित ठाऊक असतील. त्या घराण्यांनी आत्तापर्यंत बॉलिवुडमधील अनेक चित्रपट गाजवले आहेत. त्यातील एक घराणे म्हणजे श्रॉफ घराणे. जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ याने एका जीक्यु नावाच्या मासिकेला मुलाखत देताना, त्याच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या अनेक गोष्टी आपल्याला कदाचित ठाऊक सुद्धा नसतील. तर चला नक्की काय आहे, जाणून घेऊया.

‘मला फर्शीवर झोपावे लागले होते’

टायगर श्रॉफनुसार ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा जॅकी श्रॉफ यांनी बॉलिवुडमध्ये करिअर सुरू देखील नव्हते. तेव्हा त्यांचा मुलगा टायगर अकरा वर्षाचा होता. त्यांच्या घरातील परिस्थिती हलाकीची असल्याने, त्यांनी त्यांच्या घरातील सर्व सामान विकायला सुरुवात केली होती. फर्निचर पासून अगदी शिवणकाम केलेले सामान विकून त्यांनी आपल्या घरातील उदरनिर्वाह केला होता. यामध्ये टायगरचा बेड देखील विकला गेला. हे सांगताना टायगर म्हणतो की, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव होता. मला त्या वयात काम करायचं होतं, पण मला माहीत होतं की मी कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाही.” (why jackie shroff had to sell his house and furtinure)

चित्रपट न चालल्यामुळे विकावं लागलं घर

जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या पत्नी आयशासोबत २००२ मध्ये ‘बुम’ नावाचा एक चित्रपट केला होता. त्या चित्रपटात अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, गुलशन ग्रोवर, कॅटरीना कैफ, पद्म लक्ष्मी, मधु सप्रे, झीनत अमान सारखे दिग्गज कलाकार होते. विशेष म्हणजे, कॅटरीनाचा हा पहिला हिंदी चित्रपट होता. मात्र हा चित्रपट रिलीझ होण्याआधीच लीक झाला. म्हणून हा चित्रपट पूर्णपणे तोट्यात गेला. त्यामुळे श्रॉफ परिवाराला परत आर्थिक चणचणेचा सामना करावा लागला. या कारणास्तव त्यांना त्यांचे बांद्रा स्थित घर विकावे लागले.

मुलाने दिले घर परत घेण्याचे वचन

जेव्हा टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा त्याने आपल्या आईला गेलेली संपत्ती परत आणून देण्याचे वचन दिले. टायगर श्रॉफला २०१४मध्ये हिरोपंती या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर इतके मानधन मिळाले, की तो त्याचे वचन पूर्ण करू शकला असता. परंतू त्याच्या आई-वडिलांनी ते ज्या घरात राहत आहे, त्या घरातच राहण्याचा निर्णय घेतला आणि सध्या ते तिथेच राहत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्रा प्रकरण: राजची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवणी; वकिलांनी जामिनासाठी केला अर्ज

-प्रिया बापट- उमेश कामत यांची जोडी पुन्हा करणार धमाल; ‘आणि काय हवं ३’ लवकरच रसिकांच्या भेटीला

-‘काल मित्राचा कॉल आला, स्ट्रेसमधे होता…’, त्रासात असलेल्या मित्राला संतोष जुवेकरचा बहूमोल सल्ला


Leave A Reply

Your email address will not be published.