Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड अनंत आणि राधिकाच्या लग्न ठरणार जगातील सर्वात महागडे लग्न, होणार तब्बल एवढे कोटी खर्च

अनंत आणि राधिकाच्या लग्न ठरणार जगातील सर्वात महागडे लग्न, होणार तब्बल एवढे कोटी खर्च

भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट काही तासांतच लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार आहेत. सात फेरे घेण्यापूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बॉलीवूडचे सर्व बडे स्टार्सही सहभागी झाले होते. यामध्ये रणवीर सिंगपासून ते अनन्या पांडेपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची जगभरात चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जगातील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक असेल. मुकेश अंबानी आपला मुलगा अनंत आणि सून राधिकासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. या दोघांच्या लग्नावर खर्च झालेल्या पैशांबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नावर किती पैसे खर्च होत आहेत हे सांगण्यात आले आहे.

अंबानी कुटुंबाने पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेची किंमत सुमारे 7 लाख रुपये आहे. त्याचबरोबर अनंत मर्चंट आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्याचा एकूण खर्च अंदाजे 1,000 कोटी रुपये आहे. दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यावर 500 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर लग्न आणि त्यानंतर तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यांबद्दल बोलायचं झालं तर, अंबानी कुटुंबीय अनंतच्या लग्नावर अंदाजे 3,000 कोटी रुपये खर्च करत आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या पहिल्या प्री-वेडिंग सेरेमनीवर अंबानी कुटुंबाने अंदाजे 1,000 कोटी रुपये खर्च केले होते. गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी यात सहभाग घेतला आणि आपल्या परफॉर्मन्सने पार्टीला मोहिनी घातली. सोहळ्यादरम्यान जामनगरमध्ये 350 हून अधिक विमाने आल्याचीही माहिती आहे. इतकेच नाही तर पाहुण्यांच्या प्रवासाचा खर्चही अंबानी कुटुंबाने उचलला होता.

अनंत अंबानींचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. पार्टी क्रूस येथे झाली. यामध्येही मनोरंजन आणि व्यवसाय जगतातील प्रसिद्ध व्यक्तींचा ओघ होता. अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाहुण्यांसाठी 10 चार्टर फ्लाइट्स बुक केल्या होत्या. तसेच 12 खाजगी विमानांची व्यवस्था करण्यात आली. पाहुण्यांनी 150 हून अधिक आलिशान वाहनांतून प्रवास केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाने इटलीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर अंदाजे 500 कोटी रुपये खर्च केले.

अशाप्रकारे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सोहळ्यावर सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचवेळी, अहवालांवर विश्वास ठेवला तर, अंबानी कुटुंबातील लहान मुलाच्या लग्नासाठी सुमारे 2,000 कोटी रुपये खर्च आला आहे. त्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे एकूण बजेट साडेतीन कोटी रुपये असणार आहे. अशाप्रकारे, हे केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात महागडे लग्न ठरले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बाबू’च्या २५ फूट भव्य पोस्टरचे अनावरण, टायटल सॉन्ग लाँच सोहळा दिमाखात संपन्न
ट्रोलिंगबाबत इम्रान हाश्मीने मांडले मत; म्हणाला, ‘गांभीर्याने घेण्याची गरज नाही…’

हे देखील वाचा