Monday, May 27, 2024

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर लग्न करणार? अभिनेत्री म्हणाली, ‘मी फक्त…’

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. या ना त्या कारणाने ती सतत लोकांचे लक्ष वेधून घेत असते. मात्र अनेकदा अनन्या ही तिच्या ट्रोलिंगमुळे गाजत असते. तिला सतत नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकतेच तिच्या आणि आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल चर्चा सुरू आहे. ते दोघे एकमेकांना डेट करतात अशी चर्चा गेल्या काही दिवसांंपासून सुरू आहे. या चर्चांवर अनन्या पांडेने मौन सोडलं आहे.

अनन्या पांडे (Ananya Pandey)  म्हणाली की, “मी फक्त २४ वर्षांची आहे. त्यामुळे लग्नासाठी मी खूप लहान आहे. मला जास्तीत जास्त चित्रपट करून माझ्या चाहत्यांची मने जिंकायची आहेत. सध्या माझा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. पण तसे झाले तर मी तुम्हाला नक्की सांगेल.” तिच्या या उत्तरामुळे चर्चांना पुर्णविराम लागला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांना बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्यापही उघडपणे सांगितलेले नाही. काही दिवसांपूर्वी ‘ये जवानी है दिवानी’मध्ये आदित्यसोबत काम केलेला अभिनेता रणबीर कपूरने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. आदित्यबद्दल रणबीर म्हणाला होता की, मला माहित आहे की, त्याला एक मुलगी आवडते. जिच्या नावाची सुरुवात A अक्षराने होते. रणबीरचे हे शब्द ऐकल्यानंतर चाहत्यांनी ती दुसरी कोणी नसून अनन्या पांडे असल्याचे म्हटले होते.

अनन्या पांडेच्या कारकीर्द विषयी सांगायच झाले तर, अनन्याने कमी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेते. पण दुर्दैवाने तिचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगले चालत नाही. अनन्या ‘लायगर’ चित्रपटापुर्वी ‘गेहराईयां’ या चित्रपटात झळकली होती. अनन्या लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीमगर्ल २’ चित्रपटात झळकणार आहे. (Ananya Pandey criticized the affair with Aditya Roy)

अधिक वाचा- 
पूनम पांडेच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा
‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर उर्मिला मातोंडकरने केल मोठे भाष्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

हे देखील वाचा