Friday, May 24, 2024

पूनम पांडेच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून चाहते फिदा

कलाकारांच्या कामाचा महत्वपूर्ण भाग म्हणून फोटोशूटकडे बघितले जाते. कलाकार आणि त्यांचे फोटोशूट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. विविध कपडे परिधान करून ते वेगवेगळ्या पोज देऊन फोटोशूट करतात. दागिने, कपडे, ऍक्सेसरीज आदी अनेक गोष्टींच्या जाहिरातीसाठी कलाकरांना वेगवेगळे शूट करावे लागते. कलाकार आणि त्यांचे फोटोशूट नेहमीच चर्चेत असते. फोटोशूटसाठी त्यांना अनेक विचित्र कपडे परिधान करावे लागतात. काहीतरी वेगळे करण्याच्या नादात कलाकारांच्या पोज चुकतात आणि मग त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

कलाकार नेहमीच त्यांच्या फोटोशूटचे काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर करतात. याच फोटोंमुळे कधी नेटकरी त्यांचे तोंड भरून कौतुक करतात तर कधी त्यांना प्रचंड ट्रोल करतात. कलाकरांना त्यांच्या पोस्टवरून ट्रोल करणे ही काही नवीन गोष्ट नाही. आता नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पूनम पांडे (Poonam Pandey) हि पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मॉडेल- अभिनेत्री पूनम तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती नेहमीच तिच्या हॉट लूक्समुळे सतत चर्चेत असते. अशात पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे. यामागील कारण आहे, तिचे व्हायरल होणारे फोटो. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

32 वर्षीय पूनमने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुंदर फोटो शेअर केले आहेत. यावेळी पूनम पांडेने गावची परी बनून काही फोटो काढले आहेत. पूनमने ब्लू रंगाचा ड्रेस परिधान करुन फोटो काढले आहेत. पूनम पांडेने या ग्लॅमरस लुकसह चांदीचे दागिने देखील घातले आहेत. पूनमने हातात चांदीच्या बांगड्या, मोठे झुमके घातले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

दरम्यान, पूनम पांडेचे फोटो पाहून एकीकडे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत, तर दुसरीकडे काहीजण ट्रोल करत आहेत. मात्र, लोकांच्या कमेंटचा पूनम पांडेवर काहीही परिणाम झालेला नाही. नकारात्मक गोष्टींची पर्वा न करता ती अनेकदा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नवनवीन लूक शेअर करताना दिसते. (Actress poonam pandey shares stunning pictures are viral on social media as she caught fans attention)

अधिक वाचा- 
‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर उर्मिला मातोंडकरने केल मोठे भाष्य, म्हणाली, “काही राजकारणी…”
लाल इश्क! पुजा सावंतचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

हे देखील वाचा