Saturday, July 27, 2024

‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर उर्मिला मातोंडकरने केल मोठे भाष्य, म्हणाली, “काही राजकारणी…”

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर होय. उर्मिला ही पहिलीच अभिनेत्री आहे, जिने राजकारणात प्रवेश केला आहे. याआधी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांनी अभिनयासोबतच राजकारणातही प्रवेश केला आहे. पण खूप कमीजण यात यशस्वी झाले आहेत. आता उर्मिला राजकारणात अभिनयाइतकीच पुढे जाते की नाही हे तर काळ ठरवेलच. नुकताच उर्मिलाने झी मराठीच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

खुपते तिथे गुप्ते’ (Urmila Matondkar ) या कार्यक्रमात बोलताना उर्मिलाने ‘पंगा क्विन’ कंगना रणौतला डिवचले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर उर्मिला मातोंडकर कंगनाबद्दल बोलली होती. नुकतेच अभिनेता अवधूत गुप्तेने ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमादरम्यान तिला काही प्रश्न विचारला. त्यावर तिने तिच्या खास शैलीत उत्तर दिले आहे.

यावेळी अवधूत गुप्ते यांनी विचारले की, एका नटीबरोबरच्या भांडणामध्ये महाराष्ट्रातील राजकारण्यांनी तुमची बाजू घेतली नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना उर्मिला म्हणाली की, “काही राजकारणी स्वत:ला चांंगले नेते समजतात. पण त्यांनीी दुसरीकडे बघायला सुरूवात केली आहे. आपल्या मातीतली, प्रदेशातील आपली व्यक्ती तिच्यावर जेव्हा इतके भयानक, गलिच्छ, खालच्या दर्जाची गोष्ट बोलली जाते, तेव्हा हे त्यांचं कर्तव्य असतं. त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीकरता उभं न राहणारी लोक काय सामान्या लोकांकरिता उभ राहणार ” असे मत तिने व्यक्त केल आहे. त्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

उर्मिला मातोंडकर विषयी बोलायच झाले तर, तिने चमत्कार, चायना गेट, जुदाई, खूबसूरत, सत्या, भूत, पिंजर, कौन, मस्त आदी या सिनेमात काम केल आहे. याशिवाय उर्मिलाने मराठी, तामिळ, मल्याळम, तेलगू या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. उर्मिला काही काळ टीव्हीवर देखील झळकली होती. (Urmila Matondkar made a big comment on the stage of ‘Khupte Til Gupte’)

अधिक वाचा- 
लाल इश्क! पुजा सावंतचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
‘Bigg Boss OTT 2’मध्ये स्पर्धकांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; एकमेकांच्या जवळ गेले आणि…

हे देखील वाचा