असं म्हटल जातं नातू आजोबाचा शेवटचा मित्र असतो, तर आजोबा नातवाचा पहिला मित्र असतात. लहान मुलं जन्माला आलं की प्रत्येकाच्या घरात एक वेगळ असं वातावरण निर्माण होत. असं वातावरण अरुण कदम यांच्या घरात पाहिला मिळाले आहे.‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरा आपली ओळख निर्माण करणारे अरुण कदम यांना आज कोणत्याही ओळखेची गरज नाही.
अरुण कदम (Arun Kadam) त्याच्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना खळखळून हसवायला मागे-पुढे पाहत नाही. अरुण कदम यांचे लाखो चाहते आहेत. अरुण कदम सोशल मीजिावर सतत सक्रिय असतात. सध्या अरुण कदम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अरुण कदम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे.
अरुण कदम यांची मुलगी सुकन्याला 19 ऑगस्ट रोजी मुलगा झाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अरुण कदम नातवाला घेऊन उभा राहिलेले दिसत आहेत. अरुण कदम आपला नातू अथांगचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता त्यांचा आणि अथांगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते अंगाई गीत गाताना दिसत आहेत. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला’ हा अभंग म्हणत अरुण कदम अथांगला झोपवताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “ले बेबी— बाबा मस्त वाटतोय हाताचा पाळणा..आता मी झोपणारच नाय.” दुसऱ्याने लिहिले की, “खूप मौल्यवान क्षण” अनेकांनी क्यूट बेबी अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते अरुण कदम जो सर्वांचा लाडका दादूस म्हणून प्रेक्षकांना आनंद देत असतात. (Angai video sung by Arun Kadam to put his grandson to sleep is viral on social media)
आधिक वाचा-
–खुशी कपूरचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ
–असं कुणासोबतही होऊ नये! ‘एड्स’मुळे जीव गमावणारे प्रसिद्ध कलाकार, एका भारतीय अभिनेत्रीचाही समावेश