Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड अनिल कपूरने लाडक्या रियाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, फराह खानकडून व्हिडिओ शेअर

अनिल कपूरने लाडक्या रियाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, फराह खानकडून व्हिडिओ शेअर

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याची मुलगी रिया कपूर हिचे शनिवारी (१४ ऑगस्ट) लग्न झाले आहे. रियाने तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी याच्याशी लग्न केले आहे. तिच्या लग्नाला अनेकजण तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. खरंतर रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. मेहेंदी, संगीत किंवा इतर कोणताही कार्यक्रम न करता ते दोघे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत रेशीमगाठीत अडकले आहेत. त्यांचे हे लग्न अनिल कपूर यांच्या मुंबईमधील जुहू येथील बंगल्यात झाले. लग्न जरी साधे असले, तरीही कलाकारांनी मात्र ग्लॅमरस अंदाजात या लग्नाला हजेरी लावली होती. अशातच रियाचे रिसेप्शन देखील झाले आहेत. यातील एक व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आला आहे.

दिग्दर्शिका फराह खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून रियाच्या रिसेप्शन पार्टीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनिल कपूर रियासोबत डान्स करताना दिसत आहे. ते दोघेही सोनम कपूरच्या ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी रियाने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा गाउन घातलेला आहे. तर अनिल कपूरने सोनेरी रंगाचा कोट घातलेला आहे. तसेच त्यांच्या हातात ड्रिंकचा ग्लास देखील दिसत आहे. त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून फराह खानने लिहिले आहे की, “बाप-लेकीचा सर्वात सुंदर डान्स.” त्यांच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहे.

अनिल कपूर बॉलिवूडमधील एक सदाबहार व्यक्तिमत्व आहे. आता जरी त्याचे वय झाले असले, तरी त्यांच्यातील जोश एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवेल असा आहे. रियाच्या लग्नात देखील तो अत्यंत डॅशिंग अंदाजात दिसत होता. (anil kapoor and rhea kapoor dance together in her reception party)

रिया आणि करण हे २००९ पासून रिलेशनमध्ये होते. त्यांच्या अफेअरची चर्चा अनेक दिवसांपासून चालू होती. अशातच त्यांच्या लग्नाची बातमी आल्याने त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच

-अफगाणिस्तानातली हृदयद्रावक परिस्थिती पाहून बॉलिवूडही झाले स्तब्ध; सुनील शेट्टी ते कंगनापर्यंत कलाकारांनी दिल्या प्रतिक्रिया

-‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा