आतल्या गोटातील बातमी! नवरदेव विकीने नववधू अंकिताला दिलेले गिफ्ट पाहून म्हणाल, ‘बडी लोग, बडी बातें’

सिनेसृष्टीत सध्या विवाहाची लाट आल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक जोडपे सध्या विवाहबद्ध होताना दिसत आहेत. राजकुमार राव-पत्रलेखा, कतरिना कैफ-विकी कौशल यांच्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनसोहबत विवाहबद्ध झाली आहे. (Ankita Lokhande Wedding)

नुकतेच या जोडप्याने राजेशाही थाटात विवाहसोहळा उरकल्याचे फोटो, व्हि़डिओ समोर आलेत. यानंतर आता एक खास आतल्या गोटातील बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नवरदेवाने नवरीला दिलेल्या महागड्या गिफ्टची.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अधिक वाचा – अखेर अंकिता लोखंडे चढली बोहल्यावर! स्टेजवर जातात अभिनेत्रीला अश्रू अनावर

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री. त्यामुळे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्याबरोबरच अंकिता आणि विकीच्या लग्नाचीसुद्धा सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. लग्नानंतर देखील हे जोडपे सध्या चर्चेत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, अंकिताला पती विकी जैनने (Vicky Jain) याने लग्नात कोट्यवधींची भेट दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

एका रिपोर्टनुसार, विकी जैनने अंकिताला एक खाजगी व्हिला (फार्म हाऊस) भेट म्हणून दिला आहे. मात्र, या व्हिलाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. या व्हिलाची किंमत अगदी कोटींच्या घरात आहे. आणि थोडेथोडके नाही तर हे फार्महाऊस तब्बल ५० कोटींचे असल्याचं म्हटलं जातंय. (Ankita Lokhande & Vicky Jain Wedding)

अंकिता लोखंडे ही जर एक प्रसिद्ध अभिनेत्री असेल, तर तिचा पती विकी जैन हा देखील एक यशस्वी उद्योजक आहे. तो विलासपूरच्या एका कोळसा उद्योजकाचा मुलगा आहे.

हेही वाचा –

Latest Post