अंकिता लोखंडेला वर्कआऊट करताना पाहून चाहत्यांना आली सुशांत सिंगची आठवण; व्हिडिओवर उमटतायेत प्रतिक्रिया


टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ती या मालिकेतून घराघरात पोहचली. टेलिव्हिजनवर तिने अर्चना नावाची एक वेगळीच ओळख निर्माण केली. अंकिता आता तिच्या एका नव्या नात्याची सुरुवात करणार आहे. अंकिताने तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिचे संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी तिने विकीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात तिने विकीला जगातील सर्वात चांगला बॉयफ्रेंड म्हणून त्याच्याबाबतीत एक खूप मोठी पोस्ट लिहिली होती. तसेच सुशांत सिंगच्या पहिल्या पुण्यतिथी निमित्त देखील तिने त्याच्या सोबतचे जुन्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता अंकिता तिच्या चाहत्यांना चॅलेंज देताना दिसत आहे.

अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती जोरदार वर्क आऊट करताना दिसत आहे. काळ्या रंगाचा स्पोर्ट्स ड्रेस घालून अंकिता चांगलीच घाम गाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने तिच्या चाहत्यांसाठी एक चलेंज दिले आहे. तिने लिहिले आहे की, “मी माझ्या विकेंडसाठी तयार आहे. तुम्ही आहात का?” यासोबतच तिने हा व्हिडिओ तिच्या फिटनेस कोच रोहितला टॅग केले आहे की, “कृपया थोडी दया करा.”

अंकिताने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिचे चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या या प्रश्नांचे उत्तर देत एकाने “हो” असे उत्तर दिले आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “मी सपोर्ट करत आहे परंतु तुझ्या एवढा वर्क आऊट नाही करू शकत.” तर एकाने लिहिले आहे की, ” काळजी घे बेबी. तू खूपच बारीक झाली आहे.” तर एकाने लिहिले आहे की, “तू मला वर्क आऊट करण्यासाठी प्रेरित करत आहेस.” (Ankita Lokhande share work out video on social media, give challenge to her fans )

तर याच निमित्त अनेकांनी सुशांत सिंगची आठवण काढली आहे. एकाने लिहिले आहे की, “तू देखील सुशांत सिंग सारखी वर्क आऊट करत आहेस का? तो देखील असाच उडी मारून वर्क आऊट करायचा.”‘

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मनिकर्णिका‌’ या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी ३’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुख सोबत काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’मध्ये अरुणिता कांजिलालचा परफॉर्मन्स पाहून सोनू कक्कर झाली इंप्रेस; दिली ‘ही’ खास भेट

-अनुराग कश्यपच्या मुलीने बॉयफ्रेंडसोबत साजरी केली नात्याची पहिली ऍनिवर्सरी; बोल्ड व्हिडिओ होतोय व्हायरल

क्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच ‘या’ सत्याचाही केला तिने उलगडा


Leave A Reply

Your email address will not be published.