Sunday, July 20, 2025
Home टेलिव्हिजन ‘पळा पळा भुतनी आली’, म्हणत नेटकऱ्यांनी केले अंकिता लोखंडेला लूकवरून ट्रोल

‘पळा पळा भुतनी आली’, म्हणत नेटकऱ्यांनी केले अंकिता लोखंडेला लूकवरून ट्रोल

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या लग्नापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. अंकिता आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) नेहमीच विविध ठिकाणी एकत्र फिरताना दिसत असतात. याशिवाय ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच या अभिनेत्रीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

लोकप्रिय टिव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने मनोरंजन जगतात चांगलीच ओळख निर्माण केली आहे. अभिनेता सुशांत सिंगसोबतच्या प्रेमप्रकरणानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. सध्या तिच्या एका ड्रेसमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेत ट्रोल केले आहे ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतीच अंकिता तिची बहीण ऐश्वर्या आणि पतीसोबत बर्थडे पार्टीला जाताना दिसली. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस, त्यावर हाय हिल्स घातल्या होत्या. यासोबतच तिने डोळ्यांना विंग्ड आयलायनरही लावले होते. राहुल महाजनच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या अंकिताला तिच्या लूकसाठी ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.

समोर आलेल्या तिच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “अंकिता लोखंडे एकदम भूतासारखी दिसते.:  तर आणखी एकाने “जादू पृथ्वीवर परत आली आहे” असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. दुसर्‍या यूजरने “हा मेकअप आहे की विनोद” असे म्हणत तिच्यावर चांगलीच टिका केली आहे. त्यामुळे नेटकरी तिच्या या लूकवर चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. अंकिता सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी ही अभिनेत्री अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. अंकिताने यावर्षी जानेवारीत बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा