Tuesday, October 28, 2025
Home बॉलीवूड अंकिता लोखंडेची सासू दिसली महाराणीच्या गेटअपमध्ये; अभिनेत्रीने केली पूजा

अंकिता लोखंडेची सासू दिसली महाराणीच्या गेटअपमध्ये; अभिनेत्रीने केली पूजा

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैन (Vicky jain)दोघे वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत असतात. बिग बॉसच्या घरातील वाद आणि अंकिताच्या सासून व्यक्त केलेली नाराजी या सगळ्याची जोरदार चर्चा रंगली. आता पुन्हा एकदा अंकिताची सासू रंजना जैन चर्चेत आल्या आहेत. महाराणीच्या गेटअपमध्ये अंकिताची सासू रंजना जैन यांचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

विकीचा मोठा भाऊ व रेशु जैनचे पती विशाल जैन यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताचे सासू-सासरे तीर्थंकार भगवान यांचे आई-वडील वामदेवी व अश्वसेन यांच्या रुपात दिसत आहेत. विकीचे आई-वडील एका वेगळ्याच पोशाखामध्ये समोर आले आहेत.
विकीची आई रंजना या महाराणीच्या पोशाखात असून वडिलांनी शेरवानी परिधान केली आहे. या पोस्टमध्ये रंजना यांनी भरजरी लेहंगा परिधान केला असून हिऱ्या मोत्याचे दागिने घातले आहेत. तर काही महिला त्यांच्या पायशी बसल्या आहेत. तर दुसऱ्या एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अंकिता आणि तिची वहिनी काही विधी करताना दिसत आहेत. यावेळी अंकिता लाल रंगाच्या साडीत दिसली.

अंकितावर नाराज होती सासू…
बिग बॉस शोमध्ये अंकिता विकी यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची भांडणं चव्हाट्यावर आली. अंकिताची सासू म्हणजेच विकी आईसुद्धा तिच्याविरोधात वक्तव्ये करताना दिसली. फॅमिली वीक नंतर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं होतं. घराबाहेर पडल्यानंतर त्या अनेक मुलाखतींमध्ये अंकिताबद्दल बोलल्या. तिच्याबद्दल अनेक वक्तव्य केली. मात्र त्यानंतर अनेक जण अंकिताच्या सपोर्टसाठी मैदानात उतरले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो…’ असं का म्हणाला अभिनेता हेमंत ढोमे?
आर माधवनचा ‘शैतान’ चित्रपटातील फर्स्ट लुक आऊट; थ्रिलर अन् बरंच काही…

हे देखील वाचा