Monday, April 27, 2026
Home मराठी ‘गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो…’ असं का म्हणाला अभिनेता हेमंत ढोमे?

‘गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो…’ असं का म्हणाला अभिनेता हेमंत ढोमे?

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता हेमंत ढोमे (hemant dhome) सध्या चर्चेत आला आहे. त्याच्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. काही दिवसांपूर्वी, क्लिनीकमधील कुत्र्याला मारहाण केल्या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काहीदिवसांनी त्यांना दंड सुनावत सोडून दिले. त्यानंतर अभिनेता हेमंत ढोमे यांने खंत व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यामध्ये कुत्र्याला दोन व्यक्ती मारहाण करताना दिसत होती. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ठाण्यातील एका क्लिनिकमधील असल्याचे समजले. यानंतर समाजात संतापाची लाट उसळली. अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

पोलिसांना माहिती मिळताच संबंधीत प्रकरणी मयुर आडाव आणि प्रशांत गायकवाड या दोन व्यक्तींना दाब्यात घेत पोलिसांनी FIR दाखल केला होता. पण, त्यानंतर त्यांच्याकडून ५० रुपये दंड घेऊन सोडून देण्यात आलं. याबाबत स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे या पेजवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर ते दोघेही पळून गेल्याचंही या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. ही पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

हेमंतने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. “लोक सहज सुटून पळू शकतात…गुन्हेगार पळतो, सामान्य अडकतो”, असं हेमंतने पोस्टमध्ये म्हटलं आहे. समाजातील अनेक घडामोडांनी हेमंत आपले परखड मत मांडत असतो. ‘झिम्मा’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा २’, ‘ये रे ये रे पैसा २’ असे सुपरहिट चित्रपटात हेमंतने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अॅडमिट कार्डवर सनी लिओनीचा फोटो; ‘त्या’ तरुणानं दिलं स्पष्टीकरण, मला माहिती नाही…
घरात गरम वातावरण अन्…म्हणून समर्थ ईशाच्या ब्रेकअपची रंगलीय चर्चा

 

हे देखील वाचा