Saturday, July 27, 2024

एकेकाळी लॉटरीचे तिकीट विकायचे अन्नू कपूर, 22 व्या वर्षी साकारली होती 70 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका

ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये मुख्य नायक, नायिकांना महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व त्यातील इतरही कलाकारांना असते. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या फक्त चित्रपटात असण्यानं त्या चित्रपटाचे महत्त्व वाढते. प्रसिद्ध अभिनेते अन्नू कपूर यांचे नाव बॉलिवूडमधील अशा कलाकारांमध्ये घेतले जाते, जे चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका न करताही प्रसिद्ध राहिले आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांनी केलेल्या भुमिकेचे कौतुक केले जाते. विविध भुमिकेतुन आपले मनोरंन करणाऱ्या अन्नू कपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांंचा जन्म 20 फेब्रुवारी 1956 रोजी झाला. या निमित्ताने त्यांच्या जीवनाविषयी जाणुन घेऊ या…

गंभीर पात्रांपासून लोकांना खदखदून हसवण्यापर्यंत अन्नू हे प्रत्येक भूमिकेत आपले सर्वोत्तम देतात. चित्रपट हिट असो की फ्लॉप, अन्नू कपूर (annu kapur) यांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही कार्यक्रमांबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी होस्ट केलेला कार्यक्रम नेहमी आठवणीत राहतो.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. त्यांची आई 40 रुपयांच्या पगारावर एका शाळेत शिकवायची. अन्नू यांनी आयएएस अधिकारी व्हायचे होते, परंतु शिक्षण न झाल्याने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांनी कमी वयातच काम करायचे ठरवले होते. त्यांनी चहा विकण्यापासून ते चूरन विकण्याचे काम केले. इतकेच नाही, तर ते लॉटरी तिकीटही विकायचे.

त्यांनी नाटकापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 22 वर्षे वय असताना त्यांनी 70 वर्ष वय असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. यानंतर सगळीकडेच त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

चित्रपट निर्माते शाम बेनेगलही हे नाटक पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यांना अन्नू यांची कामगिरी खूप आवडली. त्यांनी अन्नू यांचे कौतुक करणारे पत्र लिहिले, आणि भेटण्यास बोलावले. अन्नू कपूर यांनी शाम बेनेगल यांच्या मंदी चित्रपटापासून कारकिर्दीची सुरुवात केली होती.

अन्नू कपूर यांचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला होता. अन्नू कपूर यांचे मूळ नाव अनिल कपूर होते. मात्र, आधीपासूनच  बॉलिवूड दुनियेत अनिल कपूर होते. दोघांच्या सारख्या नावामुळे प्रेक्षकांचा घोळ होऊ नये म्हणून त्यांनी आपले नाव अन्नू कपूर असे ठेवले. अन्नू कपूर यांचा ‘सुहाना सफर’ कार्यक्रम खूप प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमांमध्ये अन्नू कपूर हे चित्रपटाच्या जगतातील काही किस्से सांगत असतात. अन्नू कपूर कधीही मुख्य अभिनेते म्हणून दिसले नाही, परंतु त्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.(annu kapoor lifestyle know about his struggling journey to the successful actor of bollywood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच आहे’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले बॉयकॉट ट्रेंडवर त्यांचे मत

शर्मिला यांचा हिंदी सिनेसृष्टीबद्दल माेठा दावा; म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चनसाठी खास स्क्रिप्ट…’

हे देखील वाचा