अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. मात्र फ्रान्समध्ये असताना त्यांच्या सामानाची चोरी झाली आहे. अन्नू यांनी नुकतीच या घटनेची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. हिंदीत बोलत अन्नू कपूरने त्यांच्या चाहत्यांना आणि श्रोत्यांना युरोपियन देशात बेफिकीरपणे फिरण्याबद्दल चेतावणी दिली आहे.
ते म्हणाला, “पॅरिसमध्ये प्राडा बॅग चोरीला गेली, त्यात बरीच रोकड आणि युरो होते. त्यात माझे आयपॅड, माझी डायरी, माझे क्रेडिट कार्ड होते. सर्व काही चोरून नेले, त्यामुळे फ्रान्समध्ये आल्यावर खूप काळजी घ्या. इथे खिसे कापणारे, मुर्ख आणि चोरांची संख्या जास्त आहे. आता मी पॅरिसला जाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार लिहणार आहे. इथल्या रेल्वेवाल्यांनी थोडा पाठिंबा दिला आणि माझ्यासोबत येणार, असे सांगितले. तर इथे आल्यावर खूप काळजी घ्या. माझ्यासोबत एक मोठी शोकांतिका घडली आहे, देवाचे आभार मानतो की पासपोर्ट माझ्याकडे होता.” अन्नू कपूरने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “मी युरोपच्या दौऱ्यावर आहे, दुर्दैवाने फ्रान्समध्ये माझ्या गॅजेट्ससह माझी बॅग आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत.” (annu kapoor s belongings stolen in france)
अभिनेत्याने क्लिप शेअर करताच, चाहत्यांनी कलाकाराला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत केला. एकाने लिहिले, “पोलीस अजिबात मदत करत नाही सर!!!!” दुसर्याने लिहिले की, “अरे देवा सर. हे ऐकून वाईट वाटले. पण माझासोबतही असं झालंय. २०१५ मध्ये पॅरिस आयफेल टॉवर येथे माझ्या आईच्या बॅगेतून आमचा बराचसा पैसा चोरीला गेला होता. हे हृदय विदारक आहे.”
एका युजरने वर्णन केले की, तो स्वतः अशाच परिस्थितीतून कसा गेला. तो म्हणाला, “प्राग ते व्हिएन्ना ट्रेनमध्ये आमच्यासोबतही असेच घडले.” दुसर्याने कमेंट केली, “हे अतिशय दुःखद आणि निराशाजनक आहे. मी कार्यालयीन भेटीसाठी दोनदा फ्रान्सला गेलो होतो आणि विशेषतः पॅरिस अशा सर्व प्रकरणांसाठी खूप बदनाम आहे. सुरक्षित रहा!” हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा