Sunday, April 20, 2025
Home बॉलीवूड आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’वर अन्नू कपूर यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘तो कोण आहे?’

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्डा’वर अन्नू कपूर यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ‘तो कोण आहे?’

बॉलिवू़ड अभिनेता आमिर खान (Aamir khan) सध्या त्याच्या ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. तो तब्बल ४ वर्षांनी कमबॅक करत आहे. परंतु त्याच्या लाल सिंग या चित्रपटाला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. याबाबत अनेकजण त्यांचे मत व्यक्त करत आहे. अशातच आता अभिनेते अन्नू कपूर (Annu kapoor) यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.

अभिनेता अन्नू कपूर यांना नुकतेच आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी असे काही सांगितले की, सगळेच हैराण झाले. अन्नू कपूर असे काही बोलू शकतात यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. अन्नू कपूरची वेब सीरिज ‘क्रॅश कोर्स’ नुकतीच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाली आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान एका पत्रकाराने अन्नू कपूर यांना आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबाबत प्रश्न विचारला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पॅपराझी व्हायरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक पत्रकार अन्नू कपूरला विचारताना दिसत आहे की सर, आमिर सरांचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होणार आहे. यावर अन्नू कपूर म्हणतात, “ते काय आहे? मी चित्रपट पाहत नाही. मला याबद्दल माहिती नाही.” थोड्याच वेळात अन्नू कपूर यांचा मॅनेजर हस्तक्षेप करतो आणि म्हणतो की, “नो कमेंट्स.”

अन्नू कपूर पुन्हा म्हणतात की, “नो कॉमेंट्स. मी चित्रपट पाहत नाही. ना प्रियजन ना अनोळखी. हा कोण आहे हे मलाही माहीत नाही. खरंच. मग तो कोण आहे हे मी कसे सांगू? मला याबाबत काहीच कल्पना नाही.ठ अन्नू कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि यूजर्स त्यावर भरपूर कमेंट करत आहेत. अन्नू कपूर यांना ‘लाल सिंग चड्ढा’ बद्दल कसे माहित नाही हे कोणालाच समजत नाही? तेही चित्रपटावर एवढा गदारोळ असताना? याशिवाय चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता चित्रपट पाहत नाही हेही लोकांना पचनी पडत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

काळीज तोडणारी बातमी! सिनेविश्व गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, चाहते शोकसागरात

‘या’ कारणामुळे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या मागे लागले पॅपराजी, व्हिडिओ व्हायरल

रणबेलिया निघाले भुर्रर्र! प्रेग्नंसीमध्ये पूर्ण बदललीय आलिया, विमानतळावरील अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

 

हे देखील वाचा