Tuesday, May 14, 2024

रणबेलिया निघाले भुर्रर्र! प्रेग्नंसीमध्ये पूर्ण बदललीय आलिया, विमानतळावरील अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

सध्या जर कोणती बॉलिवूड अभिनेत्री माध्यमांमध्ये सर्वाधिक झळकत असेल, तर ती आहे आलिया भट्ट. आलिया प्रेग्नंट असून ती या क्षणाचा आनंद लुटत आहे. प्रेग्नंसीदरम्यानही आलिया तिच्या कामावर लक्ष देत आहे. तसेच, तिच्या आगामी सिनेमांची शूटिंग करत आहे. यासोबतच ती तिच्या सिनेमांचे प्रमोशनही करत आहे. नुकताच तिचा ‘डार्लिंग्स‘ हा सिनेमा प्रदर्शित झाला. आता ती पती रणबीर कपूर याच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या जोडप्याला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

प्रेग्नंट आलियाच्या चालण्यात पाहायला मिळाला बदल
मुंबई विमानतळावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आलियाचे बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. दुसरीकडे, तिच्या चालण्यातही बदल पाहायला मिळत आहे. यामुळेही चांगलीच चर्चा रंगली आहे.

रणबीर- आलियाचा व्हिडिओ व्हायरल
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, आलिया यादरम्यान तिचा बेबी बंप सांभाळताना खूपच अतरंगी अंदाजात चालताना दिसत आहे. दुसरीकडे, रणबीर कपूर हा आलियाची काळजी घेताना दिसत आहे. यादरम्यान रणबीर आणि आलिया खूपच कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया भट्टचे बेबी बंप
यापूर्वी रणबीर आलिया यांना ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या गाण्याच्या स्क्रीनिंगदरम्यान शानदार अंदाजात स्पॉट करण्यात आले होते. आलियाने याक्षणी रणबीर कपूरसोबत पॅपराजीसमोर अनेक पोझ दिले होते. यावेळी रणबीर काळ्या रंगाच्या शर्टसोबत काळ्या रंगाच्या जीन्समध्ये दिसला होता. तसेच, आलियाने तपकिरी रंगाच्या वनपीस परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

प्रेग्नंसीने केले सर्वांनाच हैराण
आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा बनणार आहेत. आधी लग्न आणि त्यानंतर दोन महिन्यातच आलियाच्या प्रेग्नंसीच्या घोषणेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दुसरीकडे आता आलिया सध्या आपल्या बेबी बंप फ्लॉन्टमुळेही सर्वांचे लक्ष वेधत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
अमिषासोबत फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलं का? जगातल्या हँडसम अभिनेत्यांमध्ये होते त्याची गणना
‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितच्या स्थळाला नाही म्हणाले होते सुरेश वाडकर, कारण वाचून व्हाल थक्क
आलियाचं प्रेग्रेंसी फोटोशूट! बेबी बंप प्लॉंन्ट करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा