Monday, February 26, 2024

अर्जुन कपूरची बहीण ‘या’ प्रोड्यूसरला करतेय डेट, प्रियकरासह स्विमिंगपूलमधील फोटो शेअर करत म्हणाली…

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर भलेही अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली, तरी ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अंशुला अनेकदा तिच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधते. अशात आता अंशुला कपूरने प्रसिद्ध प्रोड्यूसर रोहन ठक्करसोबतचे नाते अधिकृत केले आहे. खरं तर अंशुला कपूरने रोहन ठक्करसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर अंशुला चर्चेत आली आहे.

अंशुला कपूर (anshula kapoor) हिने सोमवारी (दि. 27 मार्च)ला तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मालदीवचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंशुला कपूर आणि रोशन ठक्कर स्विमिंगपुलच्या आत एकमेकांच्या डोळ्यात बघत हसत आहेत. अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. म्हणूनच अंशुला कपूरने या फोटोसोबत ‘366’ असे कॅप्शन लिहिले आहे, व्हाईट रंगाचा हार्ट देखील टाकला आहे. अंशुला कपूरच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor)

यापूर्वी अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर यांचा एक व्हिडिओही समोर आला होता, तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत होती. अशात आता अंशुला कपूरने हा फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anshula Kapoor (@anshulakapoor)

अंशुला कपूर प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर आणि त्यांची पहिली पत्नी मोना सुरी यांची मुलगी आहे. मोना सुरी यांचे निधन झाले आहे. त्याचबरोबर रोहन ठक्कर हा पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माताही आहे. (anshula kapoor official her relationship with rohan thakkar she shares romantic photo with boyfriend rohan )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘छत्रपती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, ‘या’ साऊथ अभिनेत्याच्या एंट्रीने उडाली खळबळ

समंथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्यने खरेदी केले नवीन घर, किंमत वाचून व्हाल थक्क

हे देखील वाचा