Saturday, September 30, 2023

TMKOC | बबिता जी बनली ‘बिझनेस वूमन!’ सुरू केला ‘हा’ नवीन व्यवसाय

हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकार अभिनयाबरोबर इतरही अनेक उद्योग क्षेत्रात नशीब आजमावत असतात. आपले नवनवीन उद्योग सुरू करून ते पैसे कमवत असतात. अनेक कलाकार मोठमोठे हॉटेल बांधुन पैसे कमावत आहेत. तर काही जणांच्या प्रॉडक्शन कंपनी आहेत. आता ‘तारक मेहता…’ मधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) सुद्धा आपला नवीन बिझनेस सुरू केला आहे. ज्याची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या अभिनयाची आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याची चर्चा नेहमीच सुरू असते. तिचे युट्यूब चॅनेल सुद्धा आहे, ज्यावर ती आपले व्हिडिओ पोस्ट करत असते. आता मुनमुन दत्ताने आणखी एका नवीन बिझनेसला सुरुवात केली आहे, ज्याची माहिती तिने एक व्हिडिओ शेअर करत दिली आहे.

मुनमुन दत्ता आता खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणार आहे, ज्याची माहिती तिने एका व्हिडिओ मधून दिली आहे. या व्हिडिओमध्ये ती खाण्याचे पदार्थ चाखताना दिसत आहे. यावेळी ती म्हणते की, “मी खाद्य पदार्थांचा व्यवसाय सुरू केला आहे. मला आधीपासून खाण्याची आवड आहे. मी आणि रेड चिली इंटरटेनमेंटचे मालक केवूल शेठ जे माझे मानलेले भाऊ आहेत, आम्ही दोघे मिळून हा नवीन व्यवसाय सुरू करत आहोत. मी त्यांना चौदा वर्षापासुन ओळखते.”

या व्हायरल व्हिडिओमध्ये ती आपल्या नवीन व्यवसायाचे उदघाटन करताना दिसत आहे. यावेळी ती पदार्थांची चव चाखते. तिच्यासोबत आणखीही अनेक लोक दिसत आहेत. आधीच खवय्यी असलेली मुनमुन दत्ता या नवीन व्यवसायाने खूपच आनंदी झाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा