मागील अनेक दिवसांपासून बी-टाऊनमधून दुःखद बातम्या समोर येत आहेत. याच महिन्यात दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. त्यानंतर अभिनेता चंकी पांडे याच्या आईचे निधन झाले आहे. यातच आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. ती म्हणजे लोकप्रिय गायक अनु मलिक यांच्या आईचे निधन झाले आहे.
या गोष्टीची माहिती अनु मलिक यांचा पुतण्या आणि डब्बू मलिक यांचा मुलगा अरमान मलिक याने एक पोस्ट शेअर करून दिली आहे. अनु मलिक यांच्या आईचे निधन कशाने झाले आहे, याचे कारण अद्याप समोर आले नाही. अरमान मलिक याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. तो त्याच्या आजीला त्याची बेस्ट फ्रेंड मानत होता. त्याने सोशल मीडियावर त्याच्या आजीसोबचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. त्याचे सगळे चाहते या बातमीवर दुःख व्यक्त करत आहेत.
अरमान मलिकने आजी सोबतची पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, “आज मी माझ्या सर्वात जवळच्या मित्राला गमावले आहे. माझी आजी माझ्या आयुष्यातील प्रकाश. मी कधीही हे नुकसान भरून काढू शकत नाही. तू आतापर्यंतची सगळ्यात प्रेमळ आणि किमती व्यक्ती आहेस. मी खूप आभारी आहे की, मी तुझ्यासोबत वेळ घालवला. देवा आता माझी परी तुझ्यासोबत आहे.” (Anu Malik mother passed away Arman Malik share post)
हाती आलेल्या माहितीनुसार अनु मलिक यांच्या आईचे निधन रविवारी (२५जुलै) दुपारी ३:३० वाजता झाले आहे. यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. चाहतेही या पोस्टवर शोक व्यक्त करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नात नव्याचे काम पाहून पोटात मावत नाहीये ‘बिग बीं’चा आनंद; म्हणाले, ‘मला तुझा अभिमान आहे’
-राजेश्वरी खरातच्या बोल्डनेसने पाण्यातच लावली आग; ‘स्वीम सूट’मध्ये दिसली शालू
-धोनीसोबत फुटबॉल खेळायला पोहचला रणवीर सिंग; पाहायला मिळाली त्यांच्या बॉंडिंगची झलक