धोनीसोबत फुटबॉल खेळायला पोहचला रणवीर सिंग; पाहायला मिळाली त्यांच्या बॉंडिंगची झलक


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे तर कधी एखाद्या चित्रपटामुळे, तर कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. पण या वेळेस त्याचे चर्चेत असण्याचे कारण वेगळे आहे. या दिवसात रणवीर सिंग हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या बॉंडिंगमुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच रणवीर सिंग आणि महेंद्र सिंग धोनी यांना मुंबईमधील एका स्टेडियममध्ये फुटबॉल खेळताना पाहिले गेले आहे. तिथे ते दोघे एकमेकांसोबत खूप मस्ती करताना दिसत होते. फुटबॉल ग्राउंडमधील त्या दोघांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे गप्पा मारताना दिसत आहेत, तर मित्राप्रमाणे मिठी मारताना देखील दिसत आहेत.

रणवीर सिंग आणि महेंद्र सिंग धोनी हे दोघे ऑल स्टार्स फुटबॉल क्लबचा भाग आहेत. जे भारतातील फुटबॉल खेळाला उभारी देतात. तसेच ते चॅरिटीसाठी फंड जमा करण्यासाठी मॅच आयोजित करतात. या क्लबद्वारे आयोजित केलेल्या मॅचमध्ये बॉलिवूडसोबत क्रिकेट खेळाडू देखील भाग घेतात.

रविवारी (२५जुलै) रणवीरने काम झाल्यानंतर धोनीला मिठी मारताना फोटो काढताना पाहिले गेले. यात रणवीर संघाच्या इतर सदस्यांसोबत नियॉन ग्रीन जर्सीमध्ये दिसत आहे. रणवीरने त्याच्या केसांची पोनी टेल घातली आहे. पॅपराजींनी रणवीर सिंग आणि महेंद्र सिंग धोनीचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रणवीर आणि धोनी मस्ती करताना दिसत आहेत. (Ranveer Singh gives ms dhoni the biggest hug as he play football with him)

रणवीर सिंग आणि धोनीसोबत सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली पतौडी देखील ग्राउंडमध्ये दिसत आहे. यावेळी इब्राहिम केशरी रंगाच्या जर्सीमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या झलकमध्ये इब्राहिम स्ट्रेचिंग आणि खेळाची तयारी करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.