नात नव्याचे काम पाहून गगनात मावत नाहीये ‘बिग बीं’चा आनंद; म्हणाले, ‘मला तुझा अभिमान आहे’


बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही चित्रपट सृष्टीपासून दूर आहे. पण तिची लोकप्रियता एखाद्या कलाकारापेक्षा कमी नाहीये. ती तिच्या वडिलांनी उभा केलेला व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी मेहनत करत आहे. या वेळी नव्याने असे काही केले आहे, ज्यामुळे तिचे आजोबा अमिताभ बच्चन, मामा अभिषेक बच्चन आणि मैत्रीण सुहाना खान यांना तिचा खूप अभिमान वाटत आहे. 

नुकतेच नव्याने एका एचटी ब्रांचच्या कव्हरवर तिची जागा बनवली आहे. ज्याचा फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. २३ वर्षाच्या नव्यासोबत कव्हरवर मल्लिका साहनी, अहिल्या मेहता आणि प्रज्ञा साबू दिसत आहेत. यात नव्या महिलांच्या आरोग्याविषयी बोलली आहे. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “चला महिलांच्या आरोग्याविषयी बोलूया. या संभाषणाला सोप्पं, समाधानी आणि सरळ बनवूयात. चला याबाबत तोपर्यंत बोलूयात जोपर्यंत याबाबत सगळे गैरसमज दूर होत नाही.”

नव्याने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे की, “तुझा खूप अभिमान वाटत आहे नव्या, खूप प्रेम.” नव्याची आई श्वेता तिवारीने लिहिले आहे की, “ब्रावो आरा.” तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने लिहिले आहे की, “अमेझिंग.” यासोबतच शनाया कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, महिप कपूर आणि सोनाली बेंद्रे यांनी देखील तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. (Navya naveli nanda make proud to Amitabh Bachchan, suhana khan and many more)

नव्याने मागच्या वर्षी डिजिटल टेक्नॉलॉजी आणि यूएक्स डिझाईनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. ती हेल्थ केअर कंपनी आणि आरा हेल्थची को-फाउंडर आहे. जे महिलांसाठी काम करते. या सोबतच तिने नुकताच एक प्रोजेक्ट लॉन्च केला आहे. ज्यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. ही संस्था देशातील लैंगिक समानतेवर काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.