राजेश्वरी खरातच्या बोल्डनेसने पाण्यातच लावली आग; ‘स्वीम सूट’मध्ये दिसली शालू


सोशल मीडिया हे आता अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ झाले आहे. प्रत्येकजण आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. यात अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडिया युजर्सपैकी एक आघाडीची युजर आहे. दररोज न चुकता ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. राजेश्वरीचा एक फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या फोटोला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. 

राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती स्विमिंग पूलमध्ये बोल्ड पोझ देताना दिसत आहे. तिने लाल रंगाचा स्विमिंग सूट घातलेला आहे. तिने पाण्यात उभी राहुल पोझ दिल्या आहेत. या फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप बोल्ड दिसत आहे.

राजेश्वरीने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. राजेश्वरीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहे. अनेकजण तिला या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिने या आधी देखील जेवढे फोटो पोस्ट केले आहेत. त्या फोटोंना देखील नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. (Rajeshwari kharat share her swimming pool bold photo on social media)

राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तरं देखील दिली आहेत.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने तिच्या ‘रेड लाईट’ या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.