‘द काश्मीरी फाईल्स’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, अनुपम खेर साकारत आहे काश्मिरी पंडितची भूमिका

आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये ठसा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर. अभिनयाच्या बाबतीत खरोखरच वरदान घेऊन आलेल्या अनुपम खेर यांनी आजवर सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया साकारल्या. कॉमेडी, खलनायक, चरित्र व्यक्तिरेखा आदी अनेक भूमिका त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये साकारल्या. सध्या अनुपम खेर हे त्यांच्या आगामी बहुचर्चित अशा ‘काश्मिर फाइल्स’ या सिनेमामुळे प्रकाशझोतात आले आहेत. अनुपम यांनी ‘कू’ अँपवर पोस्ट केलेले ‘काश्मिर फाइल्स’ या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे.

अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले असून, विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. या सिनेमात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याआधी विवेक अग्निहोत्री यांचा ‘द ताश्कंद फाइल्स’ हा सिनेमा चर्चेत आला होता.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

‘कू’वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना अनुपम खेर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘हा सिनेमा, त्यातला माझा परफॉर्मन्स, मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचे भयाण आणि विदारक वास्तव आहे. जे ३० हून अधिक वर्षे लपवले गेले. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल २६ जानेवारीला.’ या सिनेमात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित नावाचे पात्र साकारत आहेत. पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. १९ जानेवारी १९९० च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावे लागते. पुढे जे काही होते त्याचे चित्रण सिनेमात केले आहे. कू वर पोस्ट करताना खेर यांनी #RightToJustice आणि #Pushkar असे हॅशटॅगही दिले आहेत.

विशेष म्हणजे, अनुपम खेर यांनी ‘कू’वर आज २० लाख फॉलोवर्स देखील पूर्ण केले आहेत. खेर ‘कू’वर सक्रिय असलेल्या सेलिब्रिटीजपैकी एक असून ते सतत खासगी जीवनासह कामाबाबतही पोस्ट शेअर करत असतात.

हेही वाचा :

सैफ अली खान आणि करीना यांचा लाडका मुलगा तैमूर झाला पाच वर्षांचा, त्याला सांभाळताना बेबोला येतो घाम

तेलंगणामधील ‘या’ समलैंगिक जोडप्याने बांधली लगीनगाठ, समाजापुढे ठेवला मोठा आदर्श

‘केस विंचरायला विसरली वाटतं!’, विमानतळावर काजोलचा विचित्र लुक नेटकऱ्यांनी विचारले तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न 

Latest Post