Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सज्जन सिंग’ बनून अनुपम श्याम यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, अंतिम क्षणी केलाय आर्थिक तंगीचा सामना

छोट्या पडद्यावरील ठाकूर सज्जन सिंग या नावाने प्रसिद्ध असलेले अनुपम श्याम (Anupam shyam) यांनी आपल्या भारदस्त आवाज आणि डॅशिंग लूकने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते आज या जगात नसतील पण त्यांच्या दमदार अभिनयासाठी ते कायम स्मरणात राहतील. अनुपम श्याम यांचा जन्म 20 सप्टेंबर 1957 रोजी प्रतापगड, उत्तर प्रदेश येथे झाला. अनुपम श्याम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली होती. जाणून घ्या अभिनय विश्वातील या दिग्गज अभिनेत्याच्या काही खास गोष्टी.

अभिनेते अनुपम श्याम यांचे शालेय शिक्षण प्रतापगड येथून झाले. यानंतर त्यांनी अवध विद्यापीठातून महाविद्यालयीन शिक्षण घेतले आणि लखनऊ येथील भरतेंदू नाट्य अकादमीमध्ये नाट्यशास्त्र शिकण्यासाठी आले. यानंतर अनुपम श्याम यांनी दिल्लीच्या श्री राम सेंटर थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि अभिनयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेले.

अनुपम श्याम यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. त्यांनी आधी ‘लिटिल बुद्धा’ आणि नंतर शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’ चित्रपटात काम केले. यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला आणि अनेक छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. अनुपम श्यामला त्याच्या लाऊड ​​लूकमुळे बहुतेक नकारात्मक पात्र मिळत असत. तो एक अभिनेता होता ज्याने वर्षानुवर्षे बॉलीवूडमध्ये काम केले होते, जरी त्याला खरी ओळख केवळ टेलिव्हिजनवरून मिळाली.

अनुपम श्याम यांनी 2009 मध्ये आलेल्या ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ या मालिकेत ठाकूर सज्जन सिंग यांची भूमिका साकारली होती आणि येथूनच त्यांना खरी ओळख मिळाली. हे पात्र इतके प्रसिद्ध झाले की, अनुपम श्यामचे दुसरे नाव ठाकूर सज्जन सिग होते आणि आजही बहुतेक लोक त्यांना याच नावाने ओळखतात. या मालिकेतही अनुपम श्याम एका ग्रे शेडच्या पात्रात दिसले होते, जो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो पण त्याची नकारात्मक बाजूही आहे.

अनुपम श्याम यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘बॅन्डिट क्वीन’, ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘द वॉरियर’, ‘थ्रेड’, ‘शक्ती’, ‘हल्ला बोल’, ‘रक्तचरित’ आणि ‘जय गंगा’ इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले. छोट्या पडद्यावर तो ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ ते ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘डोली अरमान की’ सारख्या मालिकांचा भाग होता.

अनुपम श्याम यांना दीर्घकाळ मूत्रपिंडाच्या संसर्गाचा सामना करावा लागला. ते डायलिसिसवर होते. अनुपम श्याम यांचे उत्तर मुंबई उपनगरातील एपेक्स किडनी केअर येथे डायलिसिस सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना गोरेगाव येथील लाईफलाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या भावाने सांगितले होते की, पैशांअभावी त्यांचे उपचार व्यवस्थित होत नाहीत. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदत निधीतून मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा-
चित्रपटांनी समृद्ध असणाऱ्या महेश भट्ट यांच्या करिअरला वादांमुळे लाभली काळी किनार
‘त्या’ रात्री महेश भट्ट यांना समजवण्यासाठी परवीन बाबी चक्क नग्नावस्थेत धावल्या होत्या रस्त्यावर
बिग ब्रेकिंग.! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याच्यावर संतप्त जमावाची दगडफेक

हे देखील वाचा