क्या बात है! अनुपमाने वनराजला दिली रोमँटिक डेटची ऑफर, लाजून गुलाबी झाला वनराज, पाहा मजेेशीर व्हिडिओ

Anupma and vanraj's romantic video viral on social media


टेलिव्हिजनवर अनेक मालिका आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. या मालिका म्हणजे प्रेक्षकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग वाटतो. यातच सध्या स्टार प्लस या चॅनलवर चालू असणारी अनुपमा ही मालिका प्रसिद्धीच्या झोतात आहे. या मालिकेचा टीआरपी देखील बाकी मालिकांपेक्षा जास्त आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट येत आहेत. कधी वनराज अनुपमावर नाराज होत आहे, तर कधी तो अनुपमाची काळजी घेताना दिसत आहे. यातच अनुपमाने वनराजला एका रोमँटिक डेटसाठी विचारले. हे ऐकून तुम्ही नक्कीच हैराण झाला असाल. अनुपमा तर एवढी लाजाळू आहे ती आणि रोमँटिक डेट हे समीकरण शक्यच नाही.

खरंतर रुपाली गांगुली म्हणजेच सर्वांची लाडकी अनुपमाने सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आणि शुधांशु म्हणजेच वनराज त्याच्या मालिकेतील पात्रांच्या गेटअपमध्ये आहेत. या व्हिडिओमध्ये आमिर खान आणि राणी मुखर्जी यांच्या चित्रपटातील ‘ए क्या बोलती तू’ हे गाणे वाजत आहे. या गाण्यावर वनराज आणि अनुपमा अभिनय करत आहेत. या गाण्यातील मेल पार्ट अनुपमा, तर फिमेल पार्ट वनराज करत आहे.

अनुपमाने जेव्हा वनराजला खंडाळ्याला जाण्यासाठी विचारले, तेव्हा मात्र तो लाजून लाजून गुलाबी झाला. हा व्हिडिओ शेअर करून रुपालीने कॅप्शन दिले आहे की, “जर वनराज आणि अनुपमा असे असते तर…” त्यांच्या या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ खूपच आवडला आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील सर्व शूटिंग बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनुपमा मालिकेच्या शूटिंगच्या जागेत देखील बदल झाला आहे. त्यामूळे या मालिकेची संपूर्ण टीम महाराष्ट्राबाहेर आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी देखील जाता येत नाहीये. अशातच रुपालीचा मुलगा आणि तिचा पती तिला भेटण्यासाठी सेटवर गेले होते. त्यांना पाहून तिला खूपच आनंद झाला होता. तिने त्यांच्या सोबतचा फोटो देखील शेअर केला होता.

रुपाली गांगुली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप आहेत. तिची अनुपमा ही मालिका देखील मोठ्या संख्येने पाहिली जाते. काही दिवसांपूर्वी अनुपमा मालिकेतील अनेक सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण सगळेजण सुरक्षित यातून बाहेर पडले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ज्या गायिकेच्या गाण्यांना यूट्यूबवर १ बिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळालेत, तिला कपडे धुताना पाहिलंय का? एकदा पाहाच

-बंगाल हिंसेवर ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतने रडत रडत दु: ख केले व्यक्त, सरकारकडे केली राष्ट्रपती राजवटीची मागणी

-एकदम कडक! युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने चाहत्यांना शिकवला ‘सपने में मिलती है’ गाण्यावर डान्स, थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.