Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड अनुराग कश्यपच्या ‘या’ कृत्यामुळे लेकीला येत हाेत्या बला’त्काराच्या धमक्या, संकटाच्यावेळी शाहरुखने दिला माैलाचा सल्ला

अनुराग कश्यपच्या ‘या’ कृत्यामुळे लेकीला येत हाेत्या बला’त्काराच्या धमक्या, संकटाच्यावेळी शाहरुखने दिला माैलाचा सल्ला

अनुराग कश्यप हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असा दिग्दर्शक आहे जो चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या स्पष्ट वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो. एक काळ असा होता की, जेव्हा अनुराग कश्यप सोशल मीडियावर खूप सक्रिय असायचा आणि नेहमी बेधडक विधाने करायचा. लोकांना त्यांची वादग्रस्त विधाने अजिबात आवडत नव्हती, त्यामुळेच त्याला आणि त्यांच्या मुलीला यासंदर्भात धमक्या मिळू लागल्या.

अलीकडेच अनुराग कश्यप (anurag kashyap) याने स्वतः खुलासा केला आहे की, ‘त्याच्या राजकीय मतांमुळे आणि ट्विटमुळे त्याची मुलगी आलिया हिला बला’त्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.’ या धमक्यांचा त्याच्यावर आणि त्याच्या मुलीवर वाईट परिणाम झाला. इतकंच नाही, तर अनुराग कश्यपला पॅनीक अटॅकही येऊ लागले.

शाहरुखने फाेन करुन समजावले दिग्दर्शकाला
अनुराग कश्यप याने पुढे सांगितले की, ‘शाहरुखने त्याला अनेकदा फोन करून असे करू नकाे असे समजावले. इतकंच नाही, तर शाहरुखने अभिनेत्याला ट्विटर सोड असंही समजावलं.’ अनुराग पुढे म्हणाला की, ‘शाहरुख खान कॉलेजमध्ये त्याचा सिनियर होता आणि आजही जेव्हा अनुरागला बादशाहचा फोन येतो तेव्हा तो उभा राहतो.’

मुलगी आलिया आहे अनुरागची कमजोरी
अनुराग कश्यपने सांगितले की, ‘त्यांची मुलगी आलिया ही त्यांची कमजोरी आहे. तो इतर गोष्टींशिवाय जगू शकतो, पण जेव्हा त्याच्या मुलीचा प्रश्न येतो तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो.’ त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा त्याला त्यांच्या मुलीबाबत धमक्या येत होत्या तेव्हा दिग्दर्शक खूप घाबरला होते.’

अनुराग कश्यप यांच्या विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘नाे स्माेकिंग’,’ब्लॅक फ्रायडे’, ‘ऑलमाेस्ट प्यार विथ डिजे’ यासारखी दमदार चित्रपट दिग्दर्शित केली आहे.(anurag kashyap revealed bollywood actor shahrukh khan warns to him for controversial tweets )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘किसी का भाई किसी की जान’चे नवीन गाणे रिलीज; साऊथ इंडियन लूकमध्ये दिसला सलमान खान

राखी सावंतने ताेडला राेजा, तोंड उघडत कॅमेऱ्याला दाखवले च्युइंगम; म्हणाली, ‘चुकून…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा