Wednesday, February 21, 2024

राखी सावंतने ताेडला राेजा, तोंड उघडत कॅमेऱ्याला दाखवले च्युइंगम; म्हणाली, ‘चुकून…’

सोशल मीडिया क्वीन राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून रोजा पाळत होती आणि पाच वेळा नमाजही अदा करत होती. राखीने स्वतः कॅमेऱ्यासमोर सांगितले होते की, तिने आदिलसोबत लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि अशा परिस्थितीत ती रमजान महिन्यात राेजा आणि नमाज अदा करत आहे. मात्र, यानंतरच राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये ती बोल्ड कपड्यांमध्ये डान्स करताना दिसत आहे. राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले. अशात आता राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणते आहे की, तिने चुकून च्युइंगम खाल्ल्यामुळे तिचा राेजा तुटला आहे.

राखी सावंतच्या बोल्ड डान्सनंतर आता आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पॅपराझींना चुकून च्युइंगम खाल्ल्याचे सांगताना दिसत आहे, त्यामुळे तिचा राेजा मोडला आहे. राखी सावंतला मुंबई विमानतळावर पॅपराझींने पाहिल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पॅपराझींसी बोलत असताना राखी सावंत अचानक अचानक सांगते की, “माझा उपवास मोडला आहे. मी प्रवास करत होतो, मला आठवत नाही आणि चुकून काही च्युइंगम खाल्ले.” मग ती तिचे तोंड उघडते आणि कॅमेराला च्युइंगम चघळून दाखवते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

याआधी, राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता, ज्यामध्ये ती ब्लॅक डीप नेक टॉप आणि जीन्समध्ये बोल्ड डान्स करताना दिसत होती. ‘दुपट्टा मेरा’ गाण्यावर तिने आपल्या अप्रतिम डान्स स्टेप्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. या डान्समीधील तिचे एक्सप्रेशनही जबरदस्त होते.(tv actress rakhi sawant opened her mouth and showed chewing gum on camera said mera roza tut gaya)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझा प्रतिस्पर्धी मीच’ म्हणत अभिनेते गिरीश जोशी यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

“बुरखा घातलाय का?”, म्हणत अथिया शेट्टीला साेशल मीडिया युजर्सने केले ट्राेल, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा