Tuesday, June 18, 2024

अभिमानस्पद! अनुराग काश्यपच्या ‘कॅनेडी’ सिनेमाला कान्समध्ये मिळाले स्टँडिंग ओव्हेशन, सिनेमाचा अभिनेता झाला भावुक

सध्या मनोरंजनविश्वात आणि मीडियामध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा सुरु आहे. देश विदेशातील अनेक दिग्गज आणि मोठमोठे कलाकार या फेस्टिवलला हजेरी लावताना दिसत आहे. या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय दिग्गज दिग्दर्शक असणाऱ्या अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘कॅनेडी’ या सिनेमाने मोठ्या प्रमाणावर लाइमलाइट मिळवले आहे. कान्ससोबतच सोशल मीडियावर आणि कलाकारांमध्ये फक्त याच सिनेमाची चर्चा रंगताना दिसत आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मिड नाइट स्क्रिनींग सेक्शनमध्ये ‘कॅनेडी’ या सिनेमाची स्क्रिनींग ठेवण्यात आली होती. या फेस्टिवलमध्ये या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये मार्टिन स्कॉर्सेजच्या ‘किलर्स ऑफ द फ्लावर मून’ आणि जॉनी डेपच्या ‘जीन डू बैरी’ या सिनेमाचे देखील स्क्रिनींग झाले. यावेळी या तिन्ही चित्रपटांना उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. अर्थात सर्वानी सिनेमा संपल्यानंतर उभे राहून टाळ्या वाजवल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अनुराग कश्यप दिग्दर्शित कॅनेडी या सिनेमाला ७ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद पाहून अभिनेता राहुल भट्ट भावुक झाला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. यात सर्व लोकं कॅनेडीसाठी उभे राहून टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी राहुलचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी राहुलचे कौतुक करत अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. या सिनेमात सनी लियोनी देखील महत्वाच्या भूमिकेत आहे.

हे देखील वाचा