Tuesday, May 21, 2024

अभिनेत्री नाही तर अनुष्का शर्माला बनायचे होते पत्रकार, नशिबाने अशी धरली अभिनयाची वाट

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)1 मे रोजी तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का शर्माला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण तुम्हाला माहित आहे का की, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अनुष्काची पहिली पसंती अभिनेत्री बनणे नाही तर पत्रकार बनणे होती. होय… अनुष्का शर्माला एकेकाळी पत्रकारितेत तिचं करिअर करायचं होतं, पण तिच्या नशिबाने तिला आधी मॉडेलिंग आणि नंतर अभिनयाच्या दुनियेत खेचलं. चला, अनुष्का शर्माच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही गोष्टी.

अनुष्का शर्माने शाहरुख खानच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील अनुष्का शर्माचा निरागसपणा आणि तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडली. ‘रब ने बना दी जोडी’ नंतर अनुष्काचे नशीब बदलले आणि अभिनेत्रीला चित्रपटांची ओढ लागली.

शाहरुख खाननंतर अनुष्का शर्माने शाहिद कपूरच्या बदमाश कंपनी या चित्रपटात आपली ताकद दाखवली. शाहिद कपूरनंतर अनुष्काने रणवीर सिंगसोबत बँड बाजा बारातमध्ये वेडिंग प्लॅनरची भूमिका साकारून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

अनेक चित्रपट केल्यानंतर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत जब तक है जानमध्ये दिसली. यशाची शिडी चढल्यानंतर अनुष्का शर्माने पीकेमध्ये आमिर खानसोबत काम केले.

अनेक चित्रपटांमध्ये तिचा दमदार अभिनय दाखवल्यानंतर, अनुष्का शर्माने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस उघडले, जे नंतर अभिनेत्रीने तिच्या भावाला दिले. अनुष्का शर्माने तिच्या फिल्मी करिअरमध्ये NH10, दिल धडकने दो, सुलतान, ए दिल है मुश्किल आणि परी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये ताकद दाखवली आहे.

अनुष्का शर्माच्या वैयक्तिक आघाडीबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने 2017 मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केले. आज अनुष्का आणि विराट कोहलीला दोन मुले आहेत – मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. अनुष्का शर्मा सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रणबीर कपूरच्या ॲनिमलचा कधीही न पाहिलेला खास व्हिडिओ व्हायरल, आलिया भट्टने केला होता रेकॉर्ड
‘या’ कारणामुळे अनुष्का शर्माने रणवीर सिंगला डेट केले नाही; म्हणाली, ‘मला तो आवडतो पण…’

हे देखील वाचा