Wednesday, March 22, 2023

‘आय लव्ह माय इंडिया,’ म्हणत बिग बॉस फेम सोनाली पाटीलने दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सोनाली पाटील ही ‘बिग बॉस मराठी’चा तिसऱ्या पर्वातील सर्वात जास्त चर्चेत असणारी स्पर्धक होती. तिच्या खोडकर आणि मन मोकळ्या स्वभावाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. घरात जवळपास ९० दिवसाचा प्रवास तिने केला आहे. परंतु शेवटी ही स्पर्धा आहे कोणीतरी बाहेर जावेच लागणार होते. व्होटिंग कमी मिळाल्याने ती घराबाहेर गेली.

सोनालीने (sonali patil) ‘वैजू नंबर १’ आणि ‘देवमाणूस या’ मालिकांमध्ये काही काळासाठी पात्र निभावली आहेत. यानंतर तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश त्यानंतर तिची लोकप्रियता हा हा म्हणता पसरली. आपल्या कोल्हापूरच्या रांगड्या संवाद कौशल्याने आणि तिच्या स्वभावाने तिने सगळ्याचे मन जिंकून घेतले. अशातच बुधवारी (२६ जानेवारी) रोजी तिने तिच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो की, तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच मरून रंगाचा ब्लाऊज घातला आहे. एका व्हिडिओमध्ये ती ‘आय लव्ह माय इंडिया” या गाण्यावर हावभाव केले आहे. तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये हातात तिरंगा घेऊन ती उभी आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘जयो स्तुते’ हे गाणे लागले आहे.

हे व्हिडिओ शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “उत्सव तीन रंगाचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला प्रजासत्ताक दिनाच्या, सर्वांना हार्दिक शुभेच्छा.” अशाप्रकारे तिने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिचे अनेक चाहते देखील या पोस्टवर कमेंट करून तिला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा :

गणराज्य दिन २०२२ : मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवणारी ही गाणी ऐकताच तुम्हीही बोलाल, ‘भारत माता की…जय!’

प्रजासत्ताक दिन: ‘या’ चित्रपटांमधील संवाद ऐकताच तुमच्या मनात जागृत होईल देशभक्तीची भावना; पाहा यादी

पेढे वाटा पेढे! अभिनेत्री हेजल कीचने दिला गोंडस मुलाला जन्म; माजी क्रिकेटर युवराज सिंग बनला ‘बाप’माणूस

 

हे देखील वाचा