Saturday, June 29, 2024

अनुष्का शर्माने पती विराटचं तोंडभरून केलं कौतुक; म्हणाली, ‘माझं भाग्य आहे की… ‘

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी झालेल्या विश्वचषक सामन्यात विजयाची नोंद करून भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विश्वचषक 2023च्या उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीने त्याच्या एकदिवसीय शतकांचं अर्धशतक पूर्ण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. या कामगिरीनंतर त्याची पत्नी अनुष्का शर्माने त्याच्यासाठी खास पोस्ट केली.

अनुष्काने (Anushka Sharma) विराटचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “देव हा सर्वोत्कृष्ट लेखक आहे! मी देवाची खूप आभारी आहे की मला तुझं प्रेम मिळालं, तुला दिवसेंदिवस मजबूत होताना आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होताना मला बघता आलं. तू स्वत:शी आणि खेळाशी नेहमी प्रामाणिक राहिलास. तू खरोखरच दैवी देणगी आहेस.” अनुष्काने या सामन्यात भारताच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा मोहम्मद शामीसाठीही स्टोरी टाकली. त्याचा ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा फोटो शेअर करत तिने टाळ्या वाजवणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड सामना खूपच रंजक पार पडला. भारताने न्यूझीलंडला 398 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडकडून मिचेल आणि विल्यमसन यांनी उत्तम खेळी केली, भारताला विकेटची सर्वाधिक गरज असताना शामीने दोन बळी घेतले आणि विजय खेचून आणला. या सामन्यात शामीने सात बळी घेतले. भारतीय फलंदाज व गोलंदाजांच्या उत्तम कामगिरीमुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धा 2023 च्या फायनलमध्ये पोहोचला आहे.

अनुष्काच्या या पोस्टवर चाहतेही कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांनी अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत तर काही चाहत्यांनी विराटच्या शतकांवर कौतुक केले आहे. विराट कोहलीने शतक झळकावताच अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. कोहलीने हा पराक्रम गाजवल्यानंतर तिने तिथूनच आपल्या पतीला अनेक फ्लाइंग किस्सही दिली होती.

 अनुष्का शर्मा सध्या तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. मात्र, याबाबत विराट आणि त्याच्या बाजूने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्काने 2008 मध्ये ‘रब ने बना दी जोडी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा आगामी चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस’ हा क्रिकेटर झुलन गोस्वामीवर आधारित आहे. (Anushka Sharma shared a post on social media praising her husband Virat)

आधिक वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला ‘या’ कारणामुळे करायचे नव्हते ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम
‘त्या’ व्हायरल व्हिडिओबाबत नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले, ‘मला क्षमा करा…’

हे देखील वाचा