Saturday, September 7, 2024
Home मराठी ‘त्या’ व्हायरल व्हिडिओबाबत नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले, ‘मला क्षमा करा…’

‘त्या’ व्हायरल व्हिडिओबाबत नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले, ‘मला क्षमा करा…’

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या कामामुळे आणि स्पष्ट वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. नाना यांनी नुकतेच वाराणसी येथे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका चाहत्याला थप्पड मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. आता नाना यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. ‘जर्नी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी घाटाजवळ त्यांच्यासोबत सेल्फी काढणाऱ्या एका चाहत्याचा पाठलाग करून त्याला जोरदार चापट मारून पळवून लावले होते. यानंतर अभिनेत्यावर बरीच टीका झाली. यावर आता नाना यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नानानी (Nana Patekar) सांगितलं की, “हा सीन आमच्या चित्रपटाचाच भाग आहे. आम्ही एक रिहर्सल केली होती. त्यात पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलून नकोस’ असं म्हणतो. त्यानंतर तो जातो. एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितलं. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला.”

अभिनेते नाना पुढे म्हणाले की, “मला माहित नव्हते की तो कोण होता? मला वाटले की तो आमच्या टीममधला एक आहे, म्हणून मी त्याला दृष्यानुसार थप्पड मारली आणि त्याला निघून जाण्यास सांगितले. नंतर मला कळले की. तो टीमचा भाग नव्हता, म्हणून मी त्याला परत बोलावले, पण तो पळून गेला. हा व्हिडिओ त्याच्या मित्राने शूट केला असण्याची शक्यता आहे.”

नाना पाटेकर म्हणाले की, “मी कधीही कोणाला फोटो काढण्यास नकार दिला नाही. मी असे कधीच केले नसते…जे काही झाले ते चुकून झाले. काही गैरसमजांमुळे हे घडले. मला क्षमा करा. मी पुन्हा असं कधीच करणार नाही.”

 ‘जर्नी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट ‘गदर 3’ फेम दिग्दर्शक अनिल शर्मा बनवत आहेत. या वर्षी सनी देओल स्टारर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, तो त्याच्या नवीन चित्रपटासाठी चर्चेत आहे. नाना पाटेकर व्यतिरिक्त उत्कर्ष शर्मा देखील ‘जर्नी’ मध्ये दिसणार आहे. (Famous Marathi actors nana patekar apologises says mistakenly slapped fan while shooting see video)

आधिक वाचा-
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी आता दिसतेय अशी, बँकरसोबत लग्न करून सोडला होता देश
प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला ‘या’ कारणामुळे करायचे नव्हते ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा